Chennai Teen Dies by Suicide: धक्कादायक! NEET मध्ये दोनदा नापास झाल्याने 19 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; अंतिम संस्कारानंतर वडिलांनीही संपवलं जीवन
तेव्हापासून तो दोनदा एनईईटीला बसला होता. मात्र दोन्ही वेळा तो अपयशी ठरला होता. जगदीश्वरनने शनिवारी दुपारी घरी एकटे असताना आत्महत्या केली. यादरम्यान जगदीश्वरन यांचे वडील सेल्वसेकर सतत फोन करत होते. पण जगदीश्वरनशी संपर्क होऊ शकला नाही.
Chennai Teen Dies by Suicide: चेन्नईतील (Chennai) एका व्यक्तीने आपल्या किशोरवयीन मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वास्तविक, गेल्या दोन वर्षांपासून NEET परीक्षेत वारंवार नापास झाल्याने मुलाने आत्महत्या केली होती. यानंतर त्याचे वडील छायाचित्रकार सेल्वासेकर यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर रविवारी तामिळनाडूतील चेन्नई येथील क्रोमपेट भागातील त्यांच्या कुटुंबीयांच्या घरी गळफास लावून घेतला.
प्राप्त माहितीनुसार, 19 वर्षीय एस जगदीश्वरन (Jagadeeswaran) ने 2022 मध्ये बारावी पूर्ण केली होती. तेव्हापासून तो दोनदा एनईईटीला बसला होता. मात्र दोन्ही वेळा तो अपयशी ठरला होता. जगदीश्वरनने शनिवारी दुपारी घरी एकटे असताना आत्महत्या केली. यादरम्यान जगदीश्वरन यांचे वडील सेल्वसेकर सतत फोन करत होते. पण जगदीश्वरनशी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर त्यांनी घरातील नोकराला खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले.
यानंतर घरकामगार खोलीत गेले असता, जगदीश्वरनने आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यादरम्यान घरातील नोकराने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर घाईघाईत जगदीश्वरनला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दोनदा परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याने निराश झाल्याने आपल्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे जगदीश्वरनच्या पालकांनी सांगितले होते. दुसरीकडे मुलाचे दु:ख सहन न झाल्याने सेल्वसेकर यांनी रविवारी गळफास लावून घेतला.
दुसरीकडे, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी जगदीश्वरन आणि त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मला हे जाणून धक्का बसला आहे की क्रोमपेटच्या जेगादेश्वरन, जो NEET ची परीक्षार्थी होती, याने आत्महत्या केली. त्याच्या आई-वडिलांचे सांत्वन कसे करायचे याचा विचार करत असतानाच दुसऱ्या दिवशी त्याचे वडील सेल्वसेकर यांनीही आत्महत्या केली. जेगादेश्वरन यांचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईक यांचे सांत्वन कसे करावे हे मला कळत नाही, असंही ते म्हणाले.