Uttarakhand: रिसॉर्टमधील पाहुण्यांसोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची हत्या; पीडितेच्या फेसबुक मित्राने केला मोठा खुलासा, आरोपीला अटक

भाजप नेत्याच्या मुलाच्या मालकीच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्टची मालक आणि त्याच्या इतर दोन कर्मचाऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Uttarakhand: उत्तराखंडमधील 19 वर्षीय रिसेप्शनिस्टच्या हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पीडितेच्या एका फेसबुक मित्राने आपल्या मैत्रिणीची हत्या का करण्यात आली यासंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. रिसॉर्टच्या मालकाच्या मागणीनुसार रिसॉर्टमधील पाहुण्यांसोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने पीडितेची हत्या करण्यात आल्याचं या मित्राने म्हटलं आहे. भाजप नेत्याच्या मुलाच्या मालकीच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्टची मालक आणि त्याच्या इतर दोन कर्मचाऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेचा मृतदेह सापडण्यापूर्वी तिच्या पालकांनी सोमवारी सकाळी ती तिच्या खोलीत न सापडल्याने ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

वृत्तानुसार, तिच्या एका मित्राने आता सांगितले आहे की, ज्या रात्री तिची हत्या करण्यात आली. तेव्हा ती संकटात होती, हे सांगण्यासाठी तिने आपल्या मित्राला कॉल केला होता. रिपोर्ट्सनुसार, पीडितेने तिच्या मित्राला सांगितले होते की, ती ज्या रिसॉर्टमध्ये काम करते, त्या रिसॉर्टचा मालक आणि मॅनेजर तिला रिसॉर्टच्या पाहुण्यांसोबत सेक्स करण्यास भाग पाडत होता. (हेही वाचा - Delhi Horror: दिल्लीमध्ये 12 वर्षाच्या मुलावर 4 जणांचा सामुहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला रॉड, केली बेदम मारहाण)

दरम्यान, रात्री 8.30 नंतर तिचा फोन आला नाही. वारंवार प्रयत्न करूनही तो तिच्याशी संपर्क करू शकला नाही. तेव्हा मुलीच्या मित्राने रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य यांना फोन केला असता त्यांनी ती खोलीत झोपायला गेल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी तिने आर्यला पुन्हा फोन केला तेव्हा त्यांचा फोनही बंद आढळला. त्यानंतर मित्राने रिसॉर्टचा मॅनेजर अंकितला फोन केला, त्याने सांगितले की तो जिममध्ये आहे. मग तो रिसॉर्टच्या शेफशी बोलला ज्याने त्याला सांगितले की, त्या दिवशी त्याने पीडितेला पाहिलं नाही.

रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य, त्याचा व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकित आर्य हा हरिद्वारचे भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. शुक्रवारी कोटद्वार येथील न्यायालयात आरोपींना घेऊन जात असताना संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif