Rajasthan Rape Case: राजस्थानमध्ये 19 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार, गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन
पीडितेने सांगितले की, ही घटना 29 नोव्हेंबर रोजी एका मैत्रिणीसोबत कॉलेजला जात असताना घडली.
राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यात 29 नोव्हेंबर रोजी एका 19 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनच्या स्टेशन हाउस ऑफिसरला (SHO) गुरुवारी रात्री पीडितेने पोलिस ठाण्यात गेल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास उशीर केल्याचे आढळून आल्याने त्याला निलंबित करण्यात आले. पीडितेने सांगितले की, ही घटना 29 नोव्हेंबर रोजी एका मैत्रिणीसोबत कॉलेजला जात असताना घडली. दोन आरोपींनी कथितपणे तिचे अपहरण करून शेतात सामूहिक बलात्कार केला, असे भरतपूरचे एसपी देवेंद्र कुमार बिश्नोई यांनी सांगितले.
स्थानिक पत्रकारांशी बोलताना पीडितेने आरोप केला की, जेव्हा ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेली तेव्हा एसएचओने तिचे ऐकले नाही. एसपी बिश्नोई यांनी सांगितले की, पीडित महिला गुरुवारी रात्री पोलिस ठाण्यात गेली होती आणि गुन्हा दाखल न झाल्याने ती एसपी कार्यालयात आली. त्यानंतर शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
काल हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ज्या पोलिस स्टेशनमध्ये पीडित मुलगी सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यासाठी गेली होती, त्या पोलिस स्टेशनच्या एसएचओला एफआयआर नोंदवण्यात उशीर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे बिश्नोई यांनी शनिवारी सांगितले. हेही वाचा Shocking! महिला प्रवाशाच्या समोर OLA चा ड्रायव्हर करू लागला हस्तमैथुन; कंपनीने केले निलंबित, तपास सुरु
या प्रकरणाचा तपास करणार्या संबंधित मंडळ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की , या प्रकरणातील एफआयआर भारतीय दंड संहितेच्या 376D गँगरेप आणि 366 महिलेचे अपहरण, अपहरण करणे किंवा तिच्या लग्नासाठी बळजबरी करणे इत्यादी या कलमांखाली नोंद करण्यात आली आहे.