Bihar Shocker: पाटण्यात 17 वर्षीय विद्यार्थिनीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; कोचिंग क्लासला जाताना घडली घटना
अनामिका असे मृत मुलीचे नाव असून ती नदवान चापौर काजीचक येथे राहणाऱ्या कमलेश कुमार यांची मुलगी आहे. अनामिका रोज तिच्या गावापासून मसौरीला कोचिंग क्लासला जात असे.
Bihar Shocker: बिहार (Bihar) मध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये गेल्या दिवसांपासून वाढ होत आहे. लहान मुले आणि महिलांवरील गुन्ह्यांच्या अनेक घटना राज्यातून समोर येत आहेत. बिहारमधील पाटणा (Patna) येथे एका विद्यार्थिनीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. पाटणाजवळील मसौरी गावात काही अज्ञात हल्लेखोरांनी अल्पवयीन मुलीवर गोळ्या झाडल्या. यावेळी पीडित मुलगी कोचिंग क्लासला (Coaching Class) जात होती. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
वृत्तानुसार, आरोपींनी कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीला मसौरी येथील मनीचक मोडजवळ दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या. अनामिका असे मृत मुलीचे नाव असून ती नदवान चापौर काजीचक येथे राहणाऱ्या कमलेश कुमार यांची मुलगी आहे. अनामिका रोज तिच्या गावापासून मसौरीला कोचिंग क्लासला जात असे. (हेही वाचा - Bihar Crime News: हुंड्यासाठी महिलेला जिवंत जाळले, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल; बिहार येथील घटना)
पटना में इंटर की छात्रा की हत्या से हड़कंप: थाने से महज 500 मीटर दूर लड़की की कनपटी में सटाकर मारी गोली, मौके पर हुई मौत@BJP4Bihar @VijayKrSinhaBih pic.twitter.com/CZpkGzm2nP
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) December 11, 2023
दरम्यान, आरोपींनी पीडित तरुणीच्या डोक्यात गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर विद्यार्थिनीला उपविभागीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनीच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आज दिनांक 11.12.23 की सुबह में मसौढ़ी थाना क्षेत्र अंतर्गत मनिचक मोड़ के पास एक लड़की को सर में गोली मारकर हत्या कर दी गई है। शव को पोस्टमार्टम हेतु भेजा गया है। अग्रतर विधि सम्मत कार्रवाई की जा रही है।
उक्त घटना के संबंध में अनुमंडल पुलिस पदाधिकारी, मसौढ़ी द्वारा दी गई बाइट.. pic.twitter.com/OrnTuCoZ13
— SDPO Masaurhi (@SdpoM34216) December 11, 2023
तथापी, पोलीस परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून अल्पवयीन मुलीवर गोळी झाडलेल्या गोळीचे कवच जप्त केले आहे. घटनेची माहिती मिळताच मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी उपविभागीय रुग्णालयात धाव घेतली.
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2023 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

