संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या लोकसभेत लडाखमधील सीमा घडामोडीवर विधान करणार आहेत.
राजनाथ सिंह उद्या लोकसभेत लडाखमधील सीमा घडामोडीवर विधान करणार ; 14 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
चीन हा एका डिजिटल कंपनीच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाचे भारतीयांवर चीन आपली नजर ठेऊन आहे.
कोरोना (Coronavirus) नावाच्या विषाणूची एक वात चीनमधील वुहान या शहरातून पेटली आणि तिचा वनवा जगभर पसरला. जगभरातील देश या वनव्यातून जात आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. कोरोना व्हायरस या संकटाशी तोंड देत असलेला भारत, बेरोजगारी, घसरलेली अर्थव्यवस्था वाढती महागाई आणि आरोग्याच्या समस्येशी तोंड देत असतानाच शेजारी राष्ट्र चीन सातत्याने वाद उकरुन काढत असेल. मग मुद्दा लद्दाख, गलवान खोरे असो किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून भारतीयांवर ठेवलेली नजर असो. आताही असाच एक धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. चीन म्हणे हजारो भारतीयांवर हेरगिरी करत आहे. भारतातील अनेक मोठे राजकीय नेते, उद्योगपती आणि हजारो नागरिकांवर चिन आपली नजर ठेऊन आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्र आणि त्याच्या विविध प्रादेशिक भाषांमधून प्रकाशित होत असलेल्या सहकारी वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीन हा एका डिजिटल कंपनीच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाचे भारतीयांवर चीन आपली नजर ठेऊन आहे.
दुसऱ्या बाजूला भारत आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरस संसर्गाच्या छायेत आहेत. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संकट अधिक गडद होत चालले आहे. भारतातील इतर राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दहा लाखांच्या पार गेला आहे. असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून एक भाषण कालच केले. या भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी, जनतेने घाबरण्याचे कारण नाही. कोरोना व्हायरस संकटासोबत लढण्यासाठी राज्य सरकार खंबीर आहे. आरोग्य यंत्रणेत योग्य तो बदल केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे जनतेने जागरुक असावे, नियम अटींचे पालन करुन निश्चिंत राहावे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनाव व्हायरस, राजकारण, अर्थकारण, खेळ, उद्योग, कृषी, गुन्हे आणि यांसह विविध क्षेत्रातील ताज्या घटना घडामोडी तपशीलासह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.