Madhya Pradesh Shocker: पोर्न पाहिल्यानंतर 13 वर्षीय भावाचा 9 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार; वडिलांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर आईसमोरच केली हत्या

आरोपीने आईसमोर बहिणीचा गळा दाबून खून केला. आपल्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी आईने त्याला पुरावे लपवण्यास मदत केली. तसेच बहिणींनीही आरोपीला साथ दिली आणि कीटक चावल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना तुरुंगात पाठवले आहे. 24 जुलै रोजी ही घटना घडली.

(Photo credit: archived, edited, representative image)

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा (Rewa) येथून भाऊ-बहिणीच्या नात्याला (Brother-sister Relationship) काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रीवा येथील जावा भागात ही घटना घडली होती. आरोपी रात्री मोबाईलवर पॉर्न (Porn) पाहत होता. आपल्या बहिणीला आपल्या पलंगाच्या शेजारी झोपलेले पाहून त्याचा ताबा सुटला आणि त्याने बहिणीवर बलात्कार (Brother Rape on Sister) केला. मुलीने वडिलांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने तिची हत्या (Murder) केली. आरोपीने आईसमोर बहिणीचा गळा दाबून खून केला. आपल्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी आईने त्याला पुरावे लपवण्यास मदत केली. तसेच बहिणींनीही आरोपीला साथ दिली आणि कीटक चावल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना तुरुंगात पाठवले आहे. 24 जुलै रोजी ही घटना घडली.

पोलिसांनी स्थापन केली एसआयटी -

9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता बलात्कार आणि गळा आवळून हत्या झाल्याचे उघड झाले. तपासासाठी पोलिस आयजी, डीआयजी आणि एसपी यांनी गावाला भेट दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसआयटी स्थापन करण्यात आली. (हेही वाचा -Hyderabad Gang Rape: हैदराबादमध्ये महिलेवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, दोघांना अटक)

पोलिसांना कुटुंबीयांवर संशय -

कुटुंबात चार मुली, एक मुलगा आणि पालकांसह सहा सदस्य आहेत. ज्या ठिकाणी निष्पाप मुलीचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी ती तिच्या 13 वर्षांच्या भावासोबत झोपली होती. दोन बहिणी आणि आई स्वतंत्रपणे झोपल्या होत्या. पोलिसांना कुटुंबीयावर संशय आला. कडक चौकशी केली असता प्रत्येकाचे म्हणणे वेगळे होते. शेवटी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. (हेही वाचा - Jalgaon Rape Case: सहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना)

आईसमोर गळा आवळून केली हत्या -

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाला गेल्या काही वर्षापासून वाईट सवयी जडल्या होत्या. फोनमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने बहिणीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. याबाबत वडिलांना माहिती देणार असल्याचे बहिणीने सांगितले. त्यानंतर आरोपीने बहिणीचा गळा दाबून खून केला. आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याने आईला याबाबत सांगितले. आईने मुलीची तपासणी केली असता तिचा श्वासोच्छवास सुरू होता. यानंतर तरुणाने आईसमोरच तिचा गळा आवळून खून केला. यावेळी बहिणीही उठल्या. घटना लपवण्यासाठी चौघांनी मिळून कीटक चावल्याची माहिती सर्वांना दिली. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement