IPL Auction 2025 Live

New Governor List: महाराष्ट्रासह 13 राज्यांना मिळाले नवे राज्यपाल; 'येथे' वाचा नवीन राज्यपालांच्या नावांची संपूर्ण लिस्ट

त्याचवेळी राधा कृष्णन माथूर यांचा लडाखच्या लेफ्टनंट राज्यपालपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला असून अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ.बी.डी. मिश्रा यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Ramesh Bais, Lt Gen Kaivalya Trivikram, Laxman Prasad Acharya, Gulabchand Kataria (PC- Wikipedia /TW/FB)

New Governor List: आज अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून अनेकांमध्ये फेरबदल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही राजीनामा दिला असून, त्यानंतर रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Maharashtra New Governor) बनवण्यात आले आहे. त्याचवेळी राधा कृष्णन माथूर यांचा लडाखच्या लेफ्टनंट राज्यपालपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला असून अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल डॉ.बी.डी. मिश्रा यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अरुणाचल, झारखंड आणि हिमाचलचे राज्यपाल बदलले -

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक नवीन राज्यपालांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना सिक्कीमचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. सीपी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी आणि शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा - Maharashtra New Governor: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून Ramesh Bais यांची नियुक्ती)

बिहार आणि नागालँडमध्येही नवीन राज्यपाल -

राष्ट्रपती मुर्मू यांनी मणिपूरचे राज्यपाल एल.ए. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. तर बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.

गुलाबचंद कटारिया झाले आसामचे राज्यपाल -

राजस्थानचे माजी गृहमंत्री आणि सध्याच्या राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कटारिया हे राजस्थानमधील भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये ओळखले जातात.

नवीन राज्यपालांची यादी -

दरम्यान, केंद्र सरकारने न्यायमूर्ती (निवृत्त) एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वभूषण हरिचंदन यांना छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.