Corona Virus: ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे 12 राज्यांनी नाकारले, यात महाराष्ट्राचाही समावेश
तेव्हा संपूर्ण देशात आक्रोश होता. त्या काळात ऑक्सिजनच्या (Oxygen) अभावामुळे सर्वात मोठी समस्या होती. ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचे प्राणही गेले आहे. परंतु राज्य सरकारने (State Government) अशी कोणतीही आकडेवारी नाकारली आहे.
जेव्हा कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. तेव्हा संपूर्ण देशात आक्रोश होता. त्या काळात ऑक्सिजनच्या (Oxygen) अभावामुळे सर्वात मोठी समस्या होती. ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचे प्राणही गेले आहे. परंतु राज्य सरकारने (State Government) अशी कोणतीही आकडेवारी नाकारली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेचा मुद्दा नुकताच संसदेतही (Parliament) उपस्थित करण्यात आला. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले होते. यानंतर केंद्राने अशा मृत्यूंबाबत राज्यांकडून डेटाची मागणी केली. आता 13 राज्यांनी हा अहवाल केंद्र सरकारला (Central Government) पाठवला आहे. यापैकी 12 राज्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांच्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाला नाही. महाराष्ट्राचाही (Maharashtra) यात समावेश आहे. त्याच वेळी केवळ पंजाबने (Punjab) चार संशयास्पद मृत्यूची कबुली दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले जेव्हा हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला. तेव्हा राज्यांना स्पष्टपणे हा प्रश्न विचारण्यात आला होता. आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार केवळ एका राज्याने संशयास्पद मृत्यूचा उल्लेख केला आहे. तर इतर कोणत्याही दुसऱ्या राज्यांने हे स्वीकारायला नकार दिला आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचे अद्याप सांगितले नाही.
यात अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले की फक्त पंजाबने म्हटले आहे की ऑक्सिजनच्या अभावामुळे चार संशयित मृत्यू झाले आहेत.