Increase Taxpayers In India: गेल्या 2 वर्षात करदात्यांच्या संख्येत 100 टक्के वाढ; रोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर झाले कमी
जीएसटीच्या प्रारंभी करदात्यांची संख्या 65 लाखांच्या घरात होती. आता ती 1.24 कोटींपेक्षा जास्त आहे. भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपा नेते अरूण जेटली (Arun Jaitley) यांची आज पुण्यतिथी आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांचे चिरस्थायी योगदान आणि 2014-19 या अवधीत केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्याचा वारसा स्मरणीय आहे.
Increase Taxpayers In India: गेल्या दोन वर्षात करदात्यांच्या संख्येत 100% वाढ झाली आहे. जीएसटीच्या प्रारंभी करदात्यांची संख्या 65 लाखांच्या घरात होती. आता ती 1.24 कोटींपेक्षा जास्त आहे. भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपा नेते अरूण जेटली (Arun Jaitley) यांची आज पुण्यतिथी आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांचे चिरस्थायी योगदान आणि 2014-19 या अवधीत केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्याचा वारसा स्मरणीय आहे.
अरुण जेटली यांचे स्मरण करताना, भारतीय कर आकारणीतील सर्वात मूलभूत सुधारणांपैकी महत्वाच्या अशा जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. जीएसटीपूर्वी व्हॅट, उत्पादन शुल्क, केंद्रीय विक्रीकर आणि अशा करांच्या एकत्रित बोजामुळे अनेक प्रकरणांमध्ये करांचा एकूण दर 31% इतका जास्त होता. प्रत्येक राज्याने वेगवेगळ्या दराने कर आकारणी केल्यामुळे देशभरातील विविध बाजारांमध्ये अकार्यक्षमता वाढली. तसेच अनुपालनाच्या खर्चात वाढ झाली. जीएसटीमुळे करभरणेच्या प्रमाणात स्थिरपणे सुधारणा होत असून 1.24 कोटी करदात्यांची नोंदणी झाली आहे.
जीएसटी करप्रणाली ग्राहक आणि करदाता, अशा दोघांसाठीही अनुकूल आहे. जीएसटीपूर्व काळात कराचे दर खूप जास्त असल्यामुळे करभरणा करू नये, अशी लोकभावना होती. मात्र आता जीएसटी अंतर्गत कमी कर भरणा करायची असल्यामुळे अनेक नागरिक पुढाकार घेत आहेत. (हेही वाचा - Arun Jaitley First Death Anniversary: PM नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह मान्यवरांकडून अरूण जेटलींना श्रद्धांजली !)
दरम्यान, केसांसाठीचे तेल, टूथपेस्ट आणि साबण अशा रोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर कमी झाले आहेत. अशा वस्तूंचे जीएसटीपूर्व काळातील कर दर 29.3% होते, जे आता 18% पर्यंत कमी झाले आहेत. फ्रिज, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, फूड ग्राइंडर्स आणि मिक्सर, भाज्यांचे ज्युस एक्सट्रॅक्टर, शेव्हर्स, हेअर क्लीपर, वॉटर हीटर्स, हेअर ड्रायर, इलेक्ट्रिक स्मूथिंग आयर्न, टीव्ही (32 इंच पर्यंत) अशा सर्व वस्तुंवरचे कर 31.3% वरून 18% पर्यंत कमी झाले आहेत. पूर्वी सिनेमाच्या तिकिटांवर 35% ते 110% कर आकारला जात असे, जीएसटीच्या काळात तो 12% आणि 18% पर्यंत खाली आला आहे.
वार्षिक 40 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या व्यवसायांना आता जीएसटी मधून सूट देण्यात आली आहे. सुरुवातीला ही मर्यादा 20 लाख रुपये होती. शिवाय, दीड कोटी रुपयांची उलाढाल असलेल्यांना कम्पोझिशन योजनेची निवड करून केवळ 1% कर भरता येईल. जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले. आजघडीला 28% कर केवळ ऐषारामाच्या वस्तूंपुरता मर्यादित आहे. या 28% गटातील 230 पैकी 200 वस्तू कमी दर गटामध्ये हलविण्यात आल्या आहेत. बांधकाम क्षेत्राला, विशेषत: गृहनिर्माण क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आला आहे. या क्षेत्रासाठी आता 5% कर लागू आहे. परवडण्याजोग्या घरांवरचा जीएसटी 1% इतका करण्यात आला आहे.