Uttar Pradesh Crime: लज्जास्पद! उत्तर प्रदेशमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपी अटकेत
यातच नोएडाच्या (Noida) सेक्टर 20 मधील आणखी एका घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच नोएडाच्या (Noida) सेक्टर 20 मधील आणखी एका घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. निठारी गावातील एका 10 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना रविवारी घडली आहे. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. तसेच पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
इब्राहिम असे या आरोपीचे नाव आहे. त्याने निठारी गावातील 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नोएडा 20 निरिक्षक आरके सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांसाठी न्यायलयीन कोठडी सुवण्यात आली आहे. हे देखील वाचा- Lady Shri Ram College Student Suicide: अभ्यासाशिवाय जिवंत राहू शकत नाही म्हणून दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची संख्या ही संपूर्ण देशासाठी चिंताजनक बाब आहे. हाथरसच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशातून सताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे इतर राज्यातही दिशा कायदा समंत करण्यात जावा, अशा मागणींनी अधिक जोर धरला आहे.