Delhi Crime: दिल्लीत 3 अल्पवयीन मित्रांनी केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
लैंगिक अत्याचारानंतर पीडित मुलाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हा मुलगा अनेक दिवसांपासून बेशुद्धावस्थेत होता.
Delhi Crime: राजधानी दिल्लीमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येते आहे. तीन अल्पवयीन मित्रांनी केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर तब्बल 13 दिवसांनी आज सकाळी 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात सीलमपूर पोलिसांनी माहिती दिली आहे. लैंगिक अत्याचारानंतर पीडित मुलाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हा मुलगा अनेक दिवसांपासून बेशुद्धावस्थेत होता. या घटनेनंतर दोन किशोरवयीन मुलांना अटक करण्यात आली होती. परंतु, नंतर त्यांच्या पालकांनी प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर बाल न्याय मंडळाने त्यांची सुटका केली होती.
या हल्ल्याप्रकरणी आणखी एका तरुणाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 18 सप्टेंबर रोजी मृत मुलावर तीन मुलांनी निर्दयीपणे लैंगिक अत्याचार केले. हल्ल्यानंतर तीन दिवसांनी आजारी पडल्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात सीलमपूर पोलिसांना माहिती दिली होती. (हेही वाचा - Satara: बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणाऱ्या मजनूला बेदम चोप, मुलं चोरणारा व्यक्ती समजून केली धुलाई)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पोलिसांचे एक पथक रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी मुलाच्या पालकांची भेट घेतली. परंतु, त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला." पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या समुपदेशनानंतर मुलाच्या आईने सांगितले की, 18 सप्टेंबर रोजी मुलाच्या तीन मित्रांनी त्याच्यावर अत्याचार केला.
Delhi | A 10-year-old boy, of PS Seelampur area was sodomized on September 18 by three friends, all aged 10-12 years. The boy passed away owing to complications from his injuries. 2 accused boys yet apprehended: Delhi Police
— ANI (@ANI) October 1, 2022
दरम्यान, आईच्या जबाबावरून भादंवि कलम 377/34 आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केल्या तपासादरम्यान असे आढळून आले की, हल्ल्यातील आरोपी हे 10-12 वर्षे वयोगटातील असून पीडित मुलाचे मित्र होते. ते दिल्लीतील न्यू सीलमपूर झोपडपट्टीत राहत होते.
(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2022 02:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

