Mizoram Quarry Collapse: मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळून 10 ठार, अनेकजण बेपत्ता; बचावकार्य सुरू
रामल चक्रीवादळामुळे येथे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयझॉलच्या मेल्थम आणि हॅलिमेन सीमेवर दगडाची खाण कोसळली.
Mizoram Quarry Collapse: मिझोराम (Mizoram) मध्ये एका खाणीत भीषण अपघात (Accident) झाला. येथे दगडाची खाण (Stone Quarry) कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अपघातानंतर सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अनेक मजूर अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. बाहेर काढण्यात आलेल्या 10 मृतदेहांपैकी 6 मृतदेह मिझोराममधील नाहीत. तर उर्वरित मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. ज्या दोन लोकांची सुटका करण्यात आली आहे त्यापैकी एक मिझोरामचा तर दुसरा बाहेरगावचा आहे.
मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये हा अपघात झाला. रामल चक्रीवादळामुळे येथे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयझॉलच्या मेल्थम आणि हॅलिमेन सीमेवर दगडाची खाण कोसळली. खाण कोसळल्याने आजूबाजूची अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. (हेही वाचा- Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनी येथे झालेल्या जिवीतहानीवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त; शक्य ती मदत करण्याचे आश्वासन)
पहा व्हिडिओ -
दोन वर्षांपूर्वी मिझोराममध्येही अशीच दुर्घटना घडली होती. राज्यातील हनथियाल जिल्ह्यात 14 नोव्हेंबर 2022 रोजी दगडाची खाण कोसळली होती. खाण सुरू असताना अनेक मोठे दगड फुटून कामगारांवर पडले, त्यामुळे 12 कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आसाम रायफल्स आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ), स्थानिक पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पथकाने बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर खाणीत गाडलेल्या 11 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.