Haj Scam: हज यात्रेच्या नावाखाली 189 यात्रेकरूंची 1.20 कोटी रुपयांची फसवणूक; ओडिशा पोलिसांकडून मुंबईतील व्यक्तीला अटक
धामनगर, भद्रक जिल्ह्यातील मीर खुर्शीद यांनी नोंदवलेल्या लेखी तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे.
Haj Scam: हज यात्रे (Haj Yatra) च्या नावाखाली 189 यात्रेकरूंची 1.20 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ओडिशा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मुंबईतील (Mumbai) एका व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. या आरोपीने 189 लोकांना हज यात्रेला घेऊन जाण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून सुमारे एक कोटी 20 लाक रुपये उकळले. धामनगर, भद्रक जिल्ह्यातील मीर खुर्शीद यांनी नोंदवलेल्या लेखी तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मुंबईस्थित टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीशी संबंधित काम करत होता.
ओडिशा EOW चे SP दिलीप त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल एजन्सीने दोन टूर पॅकेजेस ऑफर केले. तसेच आश्वासने न पाळता लोकांकडून विविध रक्कम गोळा केली. या लोकांना हजे यात्रेला घेऊन जाण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन पूर्ण न झाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. (हेही वाचा -Haj Suvidha App: हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने जारी केले 'हज सुविधा ॲप'; एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती)
हज यात्रेच्या नावाखाली यात्रेकरूंची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील व्यक्तीला ओडिशा पोलिसांकडून अटक -
या घटनेनंतर ओडिशा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर पोलिसांनी आरोपीचा माग काढला. आरोपीला पकडण्यात आले. या फसव्या टूर एजन्सीद्वारे ओडिशाबाहेरील आणखी लोकांची अशीच फसवणूक झाली आहे का? याचा तपास EOW सध्या करत आहे. अशा घोटाळ्यांना बळी पडू नये यासाठी अधिकाऱ्यांनी संभाव्य प्रवाशांना पेमेंट करण्यापूर्वी ट्रॅव्हल एजन्सीची कसून पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.