अभिनेत्री Zoa Morani ची कोरोनावर मात केल्यानंतर दुसर्‍यांदा प्लाझ्मा डोनेशन; COVID 19 Survivors ना रक्तदान करण्याचं आवाहन!

नुकतेच जोयाने दुसर्‍यांदा प्लाझ्मा डोनेशनसाठी (Plasma Donation) रक्तदान केले आहे. दक्षिण मुंबईमध्ये नायर हॉस्पिटलमध्ये (Nair Hospital) जोया रक्तदान करण्यासाठी पोहचली होती.

Zoa Morani | Photo Credits: Instagram/ zoamorani

अभिनेत्री जोया मोरानी (Zoa Morani) हीची कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई यशस्वी ठरल्यानंतर आता ती इतर रूग्णांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. नुकतेच जोयाने दुसर्‍यांदा प्लाझ्मा डोनेशनसाठी (Plasma Donation) रक्तदान केले आहे. दक्षिण मुंबईमध्ये नायर हॉस्पिटलमध्ये (Nair Hospital) जोया रक्तदान करण्यासाठी पोहचली होती. त्याचे फोटो शेअर करत तिने माहिती दिली आहे. 'प्लाझ्मा डोनेशन राऊंड 2, मागील वेळेस केलेल्या प्लाझ्मा डोनेशनमुळे एक रूग्ण ICU मधून बाहेर पडला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर मात केलेल्या रूग्णाने प्लाझ्मा डोनेशनची तयारी दाखवली तर कुणाची तरी नक्कीच मदत होऊ शकते.' अशी पोस्ट लिहीत तिने एक फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड फिल्म प्रोड्यूसर करीम मोरानी (Film Producer Karim Morani) यांच्यासह त्यांच्या दोन्ही लेकी शजा मोरानी आणि जोया मोरानी दीड - दोन महिन्याभरापूर्वी कोरोनाबाधित होत्या. वेळीच उपचार केल्यानंतर मोरानी कुटुंब कोरोनामुक्त झाले आहे. आता जोया प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढे आली आहे. तसेच तिने इतरांनाही आवाहन केले आहे. दरम्यान जगभर धुमाकूळ घालणार्‍या कोरोना व्हायरसमुळे झपाट्याने पसणार्‍या कोव्हिड 19 वर अद्याप उपचार नाहीत, लस नाहीत. त्यामुळे अत्यावस्थ रूग्णांना कोव्हिड 19 शी सामना करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला आहे.

अभिनेत्री जोया मोरानी ट्वीट 

 

View this post on Instagram

 

Plasma donation round 2...Last time it helped get a patient out of ICU , Note from my Doctor “hoping all recovered covid patients come out and donate their blood , u may be able to help someone” #NairHospital #IndiaFightsCorona #plasmaTherapy

A post shared by Zoa💫 (@zoamorani) on

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनावर मात केलेल्या रूग्णाच्या रक्तातील अ‍ॅन्टीबॉडीज घेऊन त्या अत्यावस्थ रूग्णाच्या शरीरात चढवल्या जातात. मात्र प्लाझ्मा थेरपीसाठी ICMR ने आखून दिलेल्या प्रोटोकॉल नुसार उपचार करणं आवश्यक आहे. अन्यथा ही उपचार पद्धती बेकायदेशीर आनि प्राणघातकही ठरू शकते. दरम्यान पालिका प्रशासनाकडूनही COVID 19 Survivors ना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

भारतामध्ये आज कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाख रूग्णांच्या पार गेला आहे. दरम्यान देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. काल (26 मे) च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 54758 वर पोहचला असून त्यापैकी 36004 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. त्यापैकी 16954 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now