Year Ender 2019: भारतरत्न लता मंगेशकर ते बेबी डॉल सनी लिओनी, हे आहेत ट्विटर वर ट्रेंड झालेले Top 10 Female Twitter Handles
त्यातील Top Entertainment Handles In India - Female या विभागात, सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) या बॉलीवूड अभिनेत्रीने बाजी मारली आहे
2019 या वर्षात मनोरंजन क्षेत्रात टॉप ठरलेल्या व्यक्तींची लिस्ट आज ट्विटर इंडियाने (Twitter India) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे शेअर केली आहे. त्यातील Top Entertainment Handles In India - Female या विभागात, सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) या बॉलीवूड अभिनेत्रीने बाजी मारली आहे. तर दुसऱ्या क्रमांक पथकावला आहे अनुष्का शर्माने (Anushka Sharma). अनुष्का आणि विराट ही हिट जोडी नेहमीच चर्चेत असते आणि त्यामुळेच अनुष्काचं नावं ट्विटरवर ट्रेंड होताना पाहायला मिळालेलं आहे.
सोनाक्षी आणि अनुष्का पाठोपाठ भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं नाव देखील ट्विटरच्या ट्रेंडिंग (Twitter Trend 2019) विश्वात पाहायला मिळालं. लता दीदींची प्रकृती मागील काही दिवसांपासून बारी नव्हती, म्हणून अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशा प्रकारचे संदेश ट्विटरवर लिहिले होते.
अर्चना कल्पथी (Archana Kalpathi) यांनी पाचवा क्रमांक पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बीगील या साऊथमधील सिनेमामुळे त्यांचं नाव ट्विटरवर गाजलं होतं.
त्याचसोबत बॉलीवूडमधील प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), आलिया भट्ट (Alia Bhatt) या अभिनेत्रीची नावे देखील ट्विटरच्या टॉप 10 नावांमध्ये पाहायला मिळाली. इतकंच साऊथमधील आघाडीचं नाव काजल अग्रवाल ही सुद्धा ट्विटर वर चर्चेचा विषय ठरली आहे.
बॉलीवूडच्या बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone) हिने ट्विटर ट्रेंडच्या यादीत आठवं स्थान मिळवलं आहे. सनी नेहमीच तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) जादू आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच आहे हे सिद्ध झालंय तिचं नावं टॉप 10 च्या यादीत आल्याने. या यादीत दिसलेलं एक नवखं नाव म्हणजे राकुल सिंग (Rakul Singh). साऊथ इंडस्ट्रीमधील ही आघाडीची अभिनेत्री यावर्षी तिच्या सिनेमांमुळे चर्चेत होती.