... म्हणून लता मंगेशकर आयुष्यभर अविवाहित राहिल्या
सांगितिक आयुष्याप्रमाणेच लता मंगेशकरांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक संघर्ष होते.
भारताची गानकोकिळा अशी ओळख असलेल्या गायिका लता मंगेशकर यंदा 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आजही लता दीदींच्या आवाजाची जादू दर्दी रसिकांच्या मनावर कायम आहे. लता दीदींच्या संगितिक क्षेत्रामध्ये जितका संघर्ष होता तितकाच संघर्ष त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही होता.
लता मंगेशकर का राहिल्या अविवाहीत ?
मंगेशकर भावंडांमध्ये लता मंगेशकर या सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ 4 लहान भावंडं आणि आई होती. अकाली दीनानाथ मंगेशकर म्हणजे लता दीदींच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे घराची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी कामं करणं भाग होते. त्यामुळे कामामध्ये झोकून दिलेल्या लता मंगेशकरांना वयाचा विशिष्ट टप्पा पार केल्यानंतर लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लता मंगेशकर म्हणाल्या की, 'प्रत्येक व्यक्तीला जन्म, मृत्यू आणि लग्न विशिष्ट वेळेलाच येते. जर ते आलं नाही तर ते आपलं नव्हतंच असं समजावं ! '
लता मंगेशकरांनी सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करून पार्श्वसंगीत देऊन घराची आर्थिक घडी सावरत लहान भावंडांचा सांभाळ केला.