लता दीदींची प्रकृती चांगली असताना मला त्यांच्या मृत्यूचे मेसेज येत होते - उषा मंगेशकर

त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळचा धक्कादायक प्रसंग लतादीदींच्या धाकट्या बहिण उषा मंगेशकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. अनेक दिग्गज तसेच कलाकारांनी लतादीदींची रुग्णालयात येऊन भेट घेतली होती. हळूहळू त्यांची प्रकृती चांगली होऊ लागली. परंतु, सोशल मीडियावर लता दीदींविषयी चुकीच्या बातम्या पसरू लागल्या. मी लता दीदींसमोर बसले होते आणि मला त्यांच्या मृत्यूचे मेसेज येत होते, असंही उषा मंगेशकर यांनी सांगितलं.

Usha-Mangeshkar (PC -IANS)

गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती गेल्या महिन्यात न्यूमोनियामुळे अत्यंत बिघडली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळचा धक्कादायक प्रसंग लतादीदींच्या धाकट्या बहिण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. अनेक दिग्गज तसेच कलाकारांनी लतादीदींची रुग्णालयात येऊन भेट घेतली होती. हळूहळू त्यांची प्रकृती चांगली होऊ लागली. परंतु, सोशल मीडियावर लता दीदींविषयी चुकीच्या बातम्या पसरू लागल्या. मी लता दीदींसमोर बसले होते आणि मला त्यांच्या मृत्यूचे मेसेज येत होते, असंही उषा मंगेशकर यांनी सांगितलं.

ब्रीच कँडी रुग्णालयात मी लतादीदींच्या समोर बसले होते. तेव्हा त्यांची प्रकृती अगदी चांगली होती. मात्र, मला त्याच्या निधनाचे मेसेज आणि कॉल येऊ लागले. या अफवा आमच्यासाठी अतिशय धक्कादायक होत्या. लोक काल्पनिक जगावर विश्वास ठेवतात. मी अफवा पसरु नये म्हणून फोनवर अगदी हसत बोलत होते. मात्र, लोकांना माझ्या बोलण्यावर विश्वास नव्हता, असंही उषा मंगेशकर यांनी सांगितलं. (हेही वाचा - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे सदाबहार गाणे ह्या चिमुरडीच्या तोंडून ऐकून गायक सोनू निगम ही गेला भारावून, Watch Video)

लतादीदींची प्रकृती आता उत्तम असून लवकरच त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहचेल, असा दावाही उषा यांनी या मुलाखतीत केला आहे. प्रकृती खालावण्याअगोदर लता दीदी गाणं म्हणत होत्या. परंतु, या गाण्याच्या दोन ओळी शिल्लक असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. पंरतु, आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत, अंसही उषा यांनी यावेळी सांगितलं आहे.