Virat Kohli and Anushka Sharma: विराट-अनुष्काने अलिबागमध्ये खरेदी केली 8 एकर जमीन, बांधणार फार्महाऊस

डील समीरा हॅबिटॅट्सच्या माध्यमातून झाली.

Virat and Anushka (Photo Credit - Twitter)

क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यानंतर आता विराट कोहलीही (Virat Kohli) अलिबागमध्ये (Alibaug) स्वत:साठी फार्महाऊस बांधणार आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी विराट कोहलीने अलिबागमधील जिराड गावात फार्महाऊससाठी 8 एकर जमीन खरेदी केली आहे. वृत्तानुसार, विराट आणि अनुष्का शर्माने ही जमीन 19.15 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. विराट आणि अनुष्काला ही जमीन सहा महिन्यांपूर्वीच आवडली होती, मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे 30 ऑगस्टला जमिनीचा व्यवहार करण्यासाठी येऊ शकले नाहीत. सध्या कोहली दुबईत आशिया चषक खेळत असताना त्याचा लहान भाऊ विकास कोहली याने पॉवर ऑफ अॅटर्नी घेऊन 1 कोटी 15 लाख 45 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरून ही जमीन विराट कोहलीच्या नावावर नोंदवली. डील समीरा हॅबिटॅट्सच्या माध्यमातून झाली.

रोहित शर्मा आणि रवी शास्त्री यांचे फार्महाऊसही याच भागात आहेत. हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल हे देखील अलिबागमध्ये घर बांधण्यासाठी इच्छुक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रवी शास्त्री यांनी 10 वर्षांपूर्वी अलिबागमध्ये घर बांधले होते, तर रोहित शर्माच्या म्हात्रोली-सरळ भागात तीन एकरांच्या फार्महाऊसचे बांधकाम सुरू आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2022: हाँगकाँगच्या खेळाडू टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये; आवडत्या खेळाडूंसोबत घेतले फोटो (Watch Video)

यापूर्वी ETimes मध्ये असे वृत्त आले होते की विराट कोहलीने दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या जुहू बंगल्यातील परिसराचा एक मोठा भाग भाडेतत्त्वावर घेतला आहे आणि त्यात एक रेस्टॉरंट उघडणार आहे. अमित कुमार यांनी सांगितले की, विराटला 5 वर्षांच्या लीजवर जागा देण्यात आली आहे.