Varun Dhawan: नुकताच बाबा झालेला वरुण धवन पत्नी आणि लेकीसोबत दुसरीकडे होणार शिफ्ट; हृतिक रोशनच्या जुहूमधील फ्लॅटमध्ये भाड्याने रहायला जाण्याच्या चर्चा

त्यामुळे वरुण धवन अभिनेता हृतिक रोशनचा नवा भाडेकरू झाला आहे.

Photo Credit- X

Varun Dhawan: नुकताच बाबा झालेला वरुण धवन लेक आणि पत्नी नताशा दलालसोबत दुसऱ्याकडे झाला शिफ्ट झाला आहे. 3 जून रोजी वरूणला कन्यरत्न प्राप्त झाले आहे. आतापर्यंत, वरुण धवन 2017 मध्ये त्याने खरेदी केलेल्या त्याच्या जुहू अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहत होता. मात्र, आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, वरूणने सहकारी राहिलेल्या अभिनेता हृतिक रोशनचा मुंबईतील जुहू येथील सी-फेसिंग फ्लॅट भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा:Noor Malabika Das Dies: अभिनेत्री नूर मलाबिका दासची लोखंडवाला येथे फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, ओशिवरा पोलिसांकडून तपास सुरू )

वरुण धवन आणि नताशा दलाल हृतिक रोशनचे मुंबईतील घर भाड्याने घेणार आहेत.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, "वरूण आणि नताशा दलाल त्यांच्या मुलीसह दुसरीकडे स्थलांतरित होणार आहेत. ते घर हृतिक रोशनचे असणार आहे. वरूण धवन जर हृतिक रोशनच्या फ्लॅटमध्ये स्थलांतरीत झाला तर तो अभिनेता अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा शेजारी असेल, जे एकाच इमारतीत राहतात."

 

View this post on Instagram

 

A post shared by Tellychakkar Official ® (@tellychakkar)

वरुण धवन याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर वरुण धवन ॲटली-समर्थित ॲक्शन चित्रपट बेबी जॉनमध्ये दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शन कालीस करत आहे. आगामी चित्रपटात कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी या प्रमुख भूमिकेत असणार आहेत.