Bhediya Trailer Out: वरुण धवन आणि क्रिती सेनॉनच्या 'भेडिया' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video

वरुण सोबत, क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि दीपक डोबरियाल (Deepak Dobriyal) देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 25 नोव्हेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Bhediya Trailer Out (PC- You Tube)

Bhediya Trailer Out: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या भेडिया (Bhediya) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर भेडियाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. वरुण सोबत, क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि दीपक डोबरियाल (Deepak Dobriyal) देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 25 नोव्हेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

भेडियाच्या ट्रेलरमध्ये एकीकडे कॉमेडी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे या चित्रपटात अॅक्शनही पाहायला मिळत आहे. भेडिया चावल्यानंतर वरुणचे पात्र बदलून 'इच्छाधारी भेडिया' बनल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. ट्रेलरमध्ये काही उत्कृष्ट अॅक्शन सीक्वेन्स आणि गाण्यांची झलकही पाहायला मिळते. (हेही वाचा -Pushpa 2: बहुचर्चित दाक्षिणात्य सिनेमा 'पुष्पा'च्या ब्लॉकबास्टर यशानंतर पुष्पाचा दुसरा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला)

याआधी प्रदर्शित झालेल्या 'भेडिया'चा टीझर प्रेक्षकांना खूपचं आवडला होता. भेडियाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले असून दिनेश विजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भेडियाचे लेखन निरेन भट्ट यांनी केले असून संगीत सचिन जिगर यांनी दिले आहे. चित्रपटातील गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. टीझर पाहून असे दिसते की, चित्रपटात काही चांगले अॅक्शन सीन असू शकतात. या चित्रपटाचे अॅक्शन दिग्दर्शक डॅरेल मॅक्लेलन आणि रियाज-हबीब यांनी केले आहे. त्याच वेळी, रॅपरचे श्रेय K4 केखोला जाते.

वरुण धवनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर त्याच्या यादीत मिस्टर लेले, बवाल आणि भेडिया यांचा समावेश आहे. 'भेडिया'मध्ये वरुण धवनसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भेडिया हा चित्रपट वरुणच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. त्याचे काही पोस्टर्स आणि टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच वरुण धवनचे चाहते देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. याशिवाय वरुण धवन बवाल चित्रपटात जान्हवी कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement