Urfi Javed हिचा रिंग ब्रालेट मधील लूक पाहून युजर्सने दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

टेलिव्हिजनवरील सर्वाधिक कंट्रोवर्शियल शो 'बिग बॉस' च्या घरात एन्ट्री करणारे काही सेलिब्रेटी आपल्या वागणूकीमुळे नेहमीच चर्चेत राहतात. मात्र बिग बॉस ओटीटी मधील कंटेस्टेंट उर्फी जावेद (Urfi Javed) ही घराबाहेर पडल्यानंतर ही तिच्या विचित्र फॅशनमुळे कंट्रोवर्सीची शिकार होत आहे.

Urfi Javed हिचा रिंग ब्रालेट मधील लूक पाहून युजर्सने दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
Urfi Javed (Photo Credits-Instagram)

टेलिव्हिजनवरील सर्वाधिक कंट्रोवर्शियल शो 'बिग बॉस' च्या घरात एन्ट्री करणारे काही सेलिब्रेटी आपल्या वागणूकीमुळे नेहमीच चर्चेत राहतात. मात्र बिग बॉस ओटीटी मधील कंटेस्टेंट उर्फी जावेद (Urfi Javed) ही घराबाहेर पडल्यानंतर ही तिच्या विचित्र फॅशनमुळे कंट्रोवर्सीची शिकार होत आहे. जेव्हापासून ती शो चा हिस्सा बनली होती तेव्हाच ती सतत आपल्या हॉट अंदाजामुळे इंटरनेटवर चर्चेत आहे. अशातच आता उर्फी हिचा एक लूक समोर आला असून तो पाहून युजर्सने विचित्र कमेंट्स केल्या आहेत.

उर्फी जावेद हिने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.त्यामध्ये तिने रिंग ब्रालेट घातली असून त्यामुळेच आता नेटिजन्स तापले आहेत. उर्फीची अॅनिमल प्रिंट असलेली ही ब्रालेटवरुन आता तिला विचित्र पद्धतीने सुनावले जात आहे. मात्र तिची फिगर यामधून पूर्णपणे दिसून येत आहे. या फोटोला उर्फी हिने कॅप्शन सुद्धा दिले आहे. परंतु कॅप्शन काहीही असो तिला तिच्या फॅशन सेन्सवरुन ट्रोल करण्यात येत आहे. एका युजर्सने असे म्हटले की, आणखी तोकडे कपडे नाही आहेत? तर दुसऱ्याने म्हटले, लहान कपड्यांमुळे नाव मिळवत आहेस.(जान्हवी हिचा खुशी कपूर सोबतच्या 'या' फोटोमुळे युजर्स विचारु लागले विचित्र प्रश्न)

 

View this post on Instagram

 

A post shared by Urfi (@urf7i)

दरम्यान, उर्फी हिने नुकताच एक व्हिडिओ सुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामध्ये तिने तिचा टॉप अशाप्रकारे घातला होता की, तो पाहून सुद्धा लोक चक्रावली होती. उर्फी हिचा बिग बॉस मधील प्रवास अधिक कमालीचा नव्हता. पण घरातून एक्झिट केल्यानंतर ती अधिकच चर्चेत राहू लागली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2021 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).