झी युवा डान्सिंग क्वीन मध्ये गायत्री दातार ची ठसकेदार लावणी पाहून विसरून जाल तुला पाहते रे ची भोळी इशा (Watch Video)

तुला पाहते रे मधील ईशा निमकर म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) झी युवा डान्सिंग क्वीन मध्ये येत्या आठवड्यात एक ठसेबाज लावणी सादर करताना पाहायला मिळणार आहे. नेहमी भोळी- गोंडस दिसणारी गायत्री लावणी (Lavani) करताना नऊ वार साडी मध्ये सोळा शृंगार करून कशी दिसेल याची एक छोटीशी झलक तिने स्वतःच आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहे.

Gayatri Datar (Photo Credits: Instagram)

झी युवा (Zee Yuva) वर सुरु झालेला नवा कोरा सेलिब्रिटी डान्स शो डान्सिंग क्वीन (Dancing Queen) मध्ये मराठी इंडस्ट्री मधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्री आपल्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहेत. अलीकडेच सुरु झालेल्या या कार्यक्रमात आपल्याला झी मराठीच्या मालिकांमधील काही अनेक ओळखीचे चेहरे अनोळखी रूपात पाहायला मिळत आहेत. यातीलच एक म्हणजे तुला पाहते रे मधील ईशा निमकर म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar). गायत्री येत्या आठवड्यात एक ठसेबाज लावणी सादर करताना पाहायला मिळणार आहे. नेहमी भोळी- गोंडस दिसणारी गायत्री लावणी (Lavani) करताना नऊ वार साडी मध्ये सोळा शृंगार करून कशी दिसेल याची एक छोटीशी झलक तिने स्वतःच आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. Exclusive: 'तुला पाहते रे' मालिकेतील Gayatri Datar आता नक्की काय करतेय... वाचा तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल

गायत्री दातार ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आपल्या डान्सिंग क्वीन कार्यक्रमाच्या येत्या आठवड्यातील सादरीकरणाची छोटीशी झलक शेअर केली आहे, यात तिने सांगितल्यानुसार गायत्री पहिल्यांदाच लावणी करण्याचा प्रयत्न करत आहे पण जर का तुम्ही हा प्रोमो पाहाल तर तुम्हालाही या तिच्या विधानावर विश्वास बसणार नाही, प्रोमोमध्ये अभिनेत्री आणि परीक्षक सोनाली कुलकर्णी सुद्धा गायत्रीचे कौतुक करताना कोणालाही तुला असे पाहायची सवय नाहीये अशा शब्दात दाद दिली आहे.

चला तर मग आपणही पाहुयात गायत्री दातार हिच्या लावणीची झलक

 

View this post on Instagram

 

या वेळी दंगा होणार!🙈 Can’t wait for you all to see this performance of mine...! #Lavani for the first time!♥️ . . . @zeeyuva @zeemarathiofficial @yuva_dancing_queen_official #GayatriDatar #ZeeYuva #YuvaDancingQueen #GangaBharose #DancingQueen #YDQ #DanceRealityShow #ZeeMarathi #Celebrity #Marathi #MarathiActor #MarathiActress #WeChitraMedia #actorslife #publicfigure #photography #ishanimkar #tulapahatere #tpr #fashion #actor #artistindia #Love #Support #Gratitude #keeptheloveandsupportgamestrong❤️

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial) on

यापूर्वी पहिल्या आठवड्यात गायत्रीने मन रानात गेलं गं गाण्यावर अगदी पारकर पोलका घालून स्वतःच्या लूक मध्ये डान्स केला होता, अर्थात यामध्ये तिचा निरागसपणा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता, मात्र आता दुसऱ्या आठवड्यात तिचा हा ठसकेबाज अवतार पाहून एन थंडीत टेम्परेचर वाढणार आणि दंगा होणार हे मात्र निश्चितच!

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now