लोकप्रिय गायक Mohammad Zakir Hussain यांचे निधन, आकस्मीक मृत्युमुळे चाहत्यांना धक्का

प्रसिद्ध गायक अमूल स्टार वॉइस ऑफ इंडिया फेम मोहम्मद जाकिर हुसैन (Mohammad Zakir Hussain) यांचे मंगळवारी संध्याकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

Singer Mohammad Zakir Hussain Passed Away: छत्तीसगडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक अमूल स्टार वॉइस ऑफ इंडिया फेम मोहम्मद जाकिर हुसैन (Mohammad Zakir Hussain) यांचे मंगळवारी संध्याकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. आपल्या आवाजाच्या जादूने लोकांच्या मनावर राज्य करणारे झाकीर हुसेन हे कुटुंबासह बिलासपूरला गेले होते. तेथे अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि काही वेळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि वडील असा परिवार आहे.

मोहम्मद जाकिर हुसैन यांच्या निधनाची माहिती मिळताच जुनी बस्ती वॉर्ड 4 राणी रोड धनवर पारा येथील त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक आणि हितचिंतकांचे आगमन सुरू झाले आहे. रात्री उशिरा त्याचा मृतदेह कोरबा येथे आणण्यात आला. बुधवारी दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्या येणार असल्याचे समजते.

मोहम्मद जाकीर हुसैंन यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. अत्यंत धक्कादायकरित्या त्यांचे निधन झाले आहे.