Users Trolled Kapil Sharma: ड्रग्ज प्रकरणात भारती सिंहला अटक झाल्यानंतर सोशल मिडियावर कपिल शर्मा ट्रोल, पहा ट्वीट्स
त्याच ड्रग पेडलरच्या माहितीवरून, एनसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळी कॉमेडियन भारती सिंहच्या निवासस्थानावरील कार्यालयात छापा टाकला. यावेळी भारती सिंहच्या निवासस्थानावरून 86.50 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणात झालेल्या गदारोळानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीमधूनही ड्रग्ज प्रकरणाबाबत धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. ड्रग्ज प्रकरणात नुकतेच एनसीबीने (NCB) लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंहला (Bharti Singh) अटक केल्याची बातमी समोर आली आहे, तर तिचा नवरा हर्ष लिंबाचिया याच्यासोबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, एकीकडे सोशल मीडियावर भारती सिंहच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे कॉमेडियन कपिल शर्मा याचे नाव सोशल मिडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. युजर्स कपिल शर्माला त्याच्या नावाचा हॅशटॅग वापरून त्याला ट्रोल करत असल्याचे दिसून येत आहे.
भारती सिंह कॉमेडियन कपिल शर्माचा शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये काम करत असल्याने कपिल शर्माचे नाव इंटरनेटवर ट्रोल होत आहे. अनेक युजर्सनी भारती सिंहवर बंदी घालण्याची मागणी करत कपिलच्या शोवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासह अनेक युजर्सनी कपिल आणि त्याच्या टीमचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
(हेही वाचा: कॉमेडियन भारती सिंह हिला NCB कडून अटक, ड्रग्ज प्रकरणी छापेमारी केल्यानंतर केला मोठा खुलासा)
दरम्यान, एनसीबीने शुक्रवारी अंधेरी येथून एका ड्रग पेडलरला अटक केली होती. त्याच ड्रग पेडलरच्या माहितीवरून, एनसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळी कॉमेडियन भारती सिंहच्या निवासस्थानावरील कार्यालयात छापा टाकला. यावेळी भारती सिंहच्या निवासस्थानावरून 86.50 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर एनसीबीने भारती सिंह आणि तिच्या पतीला एनसीबी कार्यालयात नेले. भारती आणि हर्ष या दोघांनी गांजा घेतल्याची कबुली दिली आहे. अखेर एनसीबीने भारती सिंहला संध्याकाळी अटक केली. या बातमीनंतर भारती सिंहचे नाव ट्विटरवर ट्रेंडिंग व्हायला सुरुवात झाले. आता कपिल शर्मा युजर्सच्या निशाण्यावर आहे.