NCB Arrests TV Actress Preetika Chauhan: टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान आणि एका व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणी नारकोटिक्स विभागाकडून अटक; 99 ग्रॅम गांजा केला जप्त
त्यांच्याकडून 99 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) आणि फैसल (Faisal) नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे.
NCB Arrests TV Actress Preetika Chauhan: मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी म्हणजेच 24 ऑक्टोबरला वर्सोवाच्या माछीमार भागातून दोन जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्याकडून 99 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) आणि फैसल (Faisal) नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. अटकेनंतर या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आले.याबाबत अधिक माहिती देताना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) सांगितले की, विभागाला यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर वर्सोवाच्या माछीमार भागात छापा टाकण्यात आला आणि 99 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशची रहिवासी असलेली प्रीतिकाने टीव्ही कार्यक्रम 'संकटमोचन महाबली हनुमान, सावधान इंडिया आणि जग जननी माँ वैष्णोदेवी या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. 2015 पासून ती मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. (हेही वाचा - Nusrat Jahan Durga Puja Dance: TMC खासदार, अभिनेत्री नुसरत जहां चा दुर्गापूजा निमित्त पारंपरिक डान्स; Watch Video)
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मादक पदार्थांच्या प्रकरणात नारकोटिक्स विभाग अधिक सक्रियरित्या काम करत आहे. आतापर्यंत नारकोटिक्स विभागाने ड्रग्ज विकणाऱ्यांना अनेकांना अटक केली आहे. सुशांतला ड्रग्ज प्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि त्याचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांनाही अटक केली गेली. मात्र, कारागृहात जवळपास एक महिना घालवल्यानंतर रियाला जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र, रियाचा भाऊ शोविक अजूनही तुरूंगात आहे.