'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो मधील प्रतीश वोरा या अभिनेत्याच्या 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Pratish Vora & his daughter (Photo Credits: Instagram)

लोकप्रिय टेलिव्हीजन शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) यातील अभिनेता प्रतीश वोरा (Pratish Vora) यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रतीश यांची मुलगी एका खेळण्यासोबत खेळत असताना तिने खेळण्याचा एक तुकडा तोंडात घातला आणि तुकडा गळ्यात अडकल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाला. ('तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये होणार नवीन दया भाभी ची एंट्री, दिशा वाखाणीची जागा घेणार ही अभिनेत्री!)

मिड डे च्या वृत्तानुसार, ही घटना काल रात्री घडली असून त्यानंतर राजकोट येथे कुटुंबियांच्या उपस्थितीत मुलीवर अत्यंसंस्कार करण्यात आले.

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

Cuteness overloaded 😘 #cutebabies #family #indiancutebaby #littlebaby #cutiepie #babygirl #cutenessoverload

A post shared by Pratish Vora (@vorapratishofficial) on

प्रतीश वोरा हे स्टार भारत वरील फॅमेली ड्रामा शो 'प्यार का पापड' यामध्ये नंदू गुप्ता ही भूमिका निभावत आहेत. याशिवाय त्यांनी 'तारक मेहता' आणि 'क्राईम पेट्रोल' यांसारख्या शो मध्ये देखील आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.