Amruta Pawar Engagement: 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' फेम अमृताचा पार पडला साखरपुडा; पहा फोटोज

मालिकेत आदिती विरूद्ध हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत आहे.

Amruta Pawar | PC: Instagram

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' फेम अमृता पवारचा (Amruta Pawar) नुकताच साखरपुडा पार पडला आहे.  झी मराठी वरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेत आदिती प्रमुख भूमिकेत आहे. सीरिअल सुरू असतानाच अमृताने नील पाटील (Neel Patil) सोबत साखरपुडा केला आहे. नील हा बायोमेडिकल इंजिनियर आहे. अमृताने सोशल मीडीयात त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज शेअर करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अमृता सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं  या मालिकेत 'अदिती' ची भूमिका साकारत आहे. मालिकेत आदिती विरूद्ध हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत आहे. अमृताने याआधी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली आहे  तर ‘दुहेरी’ या मालिकेतून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे. आदितीच्या खाजगी आयुष्याबाबत ती फारशी सोशल मीडीयामध्ये चर्चा करत नसल्याने अचानक आलेली ही गोड बातमी अनेकांना सुखद धक्काच वाटत आहे. सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajkumar Kamble (@rajkumar.kamble.1048554)

काही दिवसांपूर्वी झी मराठी वरील 'मन उडू उडू झालं' मालिकेतील हृता दुर्गुळे या मुख्य अभिनेत्रीनेही असाच मालिका सुरू असताना साखरपुडा केला आहे. हृता प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह यांची सून होणार  आहे.

 

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif