'तुझ्यात जीव रंगला' फेम हार्दिक जोशी ने सुरु केला 'हा' नवा व्यवसाय (Watch Video)

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हार्दिकने याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

Hardik Joshi (Photo Credits: Instagram)

'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jiv Rangla) मालिकेतील राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) याने आता स्वत:चा नवा व्यवसाय सुरु केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हार्दिकने याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. 'कोल्हापूर बदाम थंडाई' हा स्वत:चा कोल्ड्रींग ब्रँड राणादाने कोल्हापूरकरांसाठी सादर केला आहे. ('तुझ्यात जीव रंगला' फेम जिजा ऊर्फ अक्षया देवधर ने राणादा सोबतचा एक क्युट व्हिडिओ केला शेअर, म्हणाली 'मालिकेला करतेय Miss', Watch Video)

व्यवसायाची माहिती देण्यासाठी शेअर केलेल्या व्हिडिओत राणादा म्हणतो की, "आजवर कोल्हापूरातील आलाबवृद्धांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे या सगळ्यांसाठी मी काही पौष्टिक पदार्थ घेऊन येत आहे. माझ्या स्वत:च्या ब्रँडचे कोल्हापूर बदाम थंडाई, काजू शेक आणि बदाम शेक कोल्हापूरकरांसाठी सादर करत आहे. तर तुम्हीही या पदार्थांचा नक्की आस्वाद घ्या."

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Hѧяԁєєҡ jȏṡһı (@hardeek_joshi)

हार्दिक जोशीने 'अस्मिता', 'क्राईम पेट्रोल', 'स्वप्नांच्या पलिकडले'आणि 'दुर्वा' या मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारलेल्या होत्या. मात्र 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने त्याला अगदी घराघरांत पोहचवले. 2016 मध्ये सुरु झालेल्या या मालिकेने तब्बल 4 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यातील राणादा-अजंली बाईंची प्रेमकथा, संसार प्रेक्षकांना प्रचंड भावला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif