Yeu Kashi Tashi Me Nandayla या नव्या मालिकेमुळे आजपासून झी मराठी वर पाहायला मिळणार 'हे' मोठे बदल

मात्र असे न होता दुस-याच लोकप्रिय मालिकेने एक्झिट घेतली आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla (Photo Credits: Instagram/Zee Marathi)

आपल्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवर आज नवनवे बदल पाहायला मिळणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रोमोमुळे प्रचंड चर्चेत असलेली 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla) ही मालिका आजपासून झी मराठीवर सुरु होत आहे. आजपासून रोज रात्री 8 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या मालिकेमुळे झी मराठीवर 2 लोकप्रिय मालिकेमध्ये अनेक महत्त्वाचे बदल होत आहेत. या मालिकेमुळे 8 वाजता पाहायला मिळणारी 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका बंद होईल अशी चर्चा प्रेक्षकांमधून होत आहे. मात्र असे न होता दुस-याच लोकप्रिय मालिकेने एक्झिट घेतली आहे.

ही मालिका म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला' (Tujyat Jiv Rangla)... ही मालिका रोज संध्याकाळी 6.30 वाजता दाखवली जात होती. मात्र ही मालिका संपली असून त्या जागी माझ्या नव-याची बायको (Majya Navryachi Bayko) ही मालिका दाखवली जाणार आहे.हेदेखील वाचा- Yeu Kashi Tashi Me Nandayla: 'येऊ कशी तशी मी नांदायला' च्या प्रोमोत दिसणारी अन्विता फलटणकर हिने रवी जाधव च्या 'ह्या' सुपरहिट चित्रपटात केली होती सहकलाकाराची भूमिका

 

View this post on Instagram

 

A post shared by येऊ कशी तशी मी नांदायला ™ 💕 (@yeu_kashi_tashi_mi_nandayla)

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेमुळे या दोन लोकप्रिय मालिकेमध्ये हे बदल झाले आहे. तसेच झी मराठीवरील अन्य मालिकांचा विचार केला असता, गेली 16 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमात देखील आज नवीन पर्व सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम करत होते. मात्र आजपासून ते वहिनींच्या घरी पुन्हा जाणार आहे. मात्र यात आजपासून वहिनींच्या माहेरी जाणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये हा कार्यक्रमाला घेऊन प्रचंड उत्सुकता आहे.

तसेच सर्वांची लाडकी मालिका 'अग्गंबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) मध्ये देखील आज दत्तात्रय बंडोपत कुलकर्णी यांची एन्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिवंगत अभिनेते रवी पटवर्धन यांची जागा घेणार आहेत. त्यामुळे सर्वांना या मालिकेचा आजचा एपिसोड बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे. म्हणजेच आजपासून या मालिकेत 'कोंबडीच्या, चप्पलचोर' हे शब्द प्रेक्षकांच्या पुन्हा कानी पडणार आहेत. थोडक्यात आजचा दिवस झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी खूपच रंजक असणार आहे असे म्हणायला हरकत नाही. स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी यांना तगडी टक्कर देण्यासाठी झी मराठी पूर्णपणे सज्ज झालय हेच यावरून दिसतय.