The Big Picture Promo: 'द बिग पिक्चर' द्वारे Ranveer Singh करणार टीव्हीवर डेब्यू; समोर आला शोचा हटके प्रोमो (Watch Video)
रणवीर छोट्या पडद्यावर ‘द बिग पिक्चर’ (The Big Picture) नावाचा क्विझ शो घेऊन येत आहे. रणवीरचा हा नवीन शो कलर्स टीव्हीवर येणार असून या शोचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.
मोठ्या पडद्यावरील यशानंतर आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) छोट्या पडद्यावर आगमन करीत आहे. होय, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या स्टार्सनंतर बॉलिवूडचा 'गल्ली बॉय' टीव्हीवर आपले नशीब अजमावू पाहत आहे. एका टीव्हीशो द्वारे तो लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीर छोट्या पडद्यावर ‘द बिग पिक्चर’ (The Big Picture) नावाचा क्विझ शो घेऊन येत आहे. रणवीरचा हा नवीन शो कलर्स टीव्हीवर येणार असून या शोचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या शोची निर्मिती बानीजय एशिया आणि आयटीव्ही स्टुडिओ ग्लोबल एंटरटेनमेंट बी व्ही यांची आहे.
कलर्स वाहिनीने शनिवारी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ‘द बिग पिक्चर’चा प्रोमो शेअर केला आहे. शोच्या या पहिल्या प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे की रणवीरचा हा गेम शो चित्रांवर आधारित असेल. मात्र, या शोची नक्की संकल्पना काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल. शोच्या प्रोमोमध्ये रणवीर म्हणताना दुसत आहे की- ''तस्वीरों में मिलेंगे सवाल और जवाब में मिलेंगे करोड़ों. आ रहे हैं रणवीर सिंह तस्वीर से आपकी तकदीर बदलने.'
हा नवीन शो एक क्विझ शो असून, यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या ज्ञान आणि मेमोरीची चाचणी घेतली जाणार आहे. स्पर्धकांना व्हिज्युअलवर आधारित 12 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. शोमध्ये तीन लाइफलाइन देखील आहेत. (हेही वाचा: Oscar Academy's 'Class of 2021': विद्या बालन, एकता कपूर आणि शोभा कपूर यांना ऑस्करकडून निमंत्रण; करू शकणार चित्रपटांसाठी मतदान)
रणवीर सिंगने इंडियन एक्स्प्रेसला आपल्या टीव्हीवरील पदार्पणाबद्दल सांगितले की, ‘एक कलाकार म्हणून माझ्या प्रवासात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्याची आणि एक्सप्लोर करण्याची इच्छा होती. म्हणूनच आता मी टीव्हीद्वारे लोकांचे मनोरंजन करणार आहे. भारतीय सिनेमाने मला खरोखर खूप काही दिले आहे, ज्याचा मी नेहमीच आभारी असेन.’
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)