स्टार प्रवाह वरील 'जिवलगा' मालिकेचा प्रवास संपला; सिद्धार्थ चांदेकर, स्वप्निल जोशी यांची खास पोस्ट
या निमित्ताने अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी खास पोस्ट केली आहे.
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका 'जिवलगा' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्वप्निल जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या या मालिकेचा प्रवास सुरुवातीपासूनच ठरलेला होता. त्यामुळे मालिका कुठेही रटाळ न होता किंवा लांबत न जाता योग्य वेळी प्रेक्षकांना 'बाय' म्हणणार आहे. मालिकेचा विषय फारसा वेगळा नसला तरी त्याची बांधणी आणि मांडण्याची पद्धत प्रेक्षकांना फार भावली. त्याचबरोबर विश्वास, काव्या, निखिल आणि विधी ही पात्रं या बड्या कलाकार मंडळींनी अगदी अचूक वठवल्याने त्यांच्यातील वेगळेपण प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेले. त्याचबरोबर या मालिकेच्या शिर्षक गीताने तर सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं.
आता ही आगळीवेगळी मालिका आपला प्रवास संपवत आहे. या निमित्ताने अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी खास पोस्ट केली आहे. (‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन)
सिद्धार्थने मालिकेचे शिर्षकगीत शेअर करत स्टार प्रवाह वाहिनीचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर ही मालिका माझ्या वाट्याला आल्याने आनंदी असल्याचे म्हणत जिवलगा माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्याने स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर आणि मधूरा देशपांडे या सहकलाकारांचे आभार मानले असून प्रेक्षकांनाही धन्यवाद दिले आहेत. (स्वप्नील जोशी-अमृता खानविलकर 'जिवलगा' मालिकेतून पुन्हा एकत्र, पहा Promo)
सिद्धार्थ चांदेकर याची पोस्ट:
तर स्वप्निल जोशीने याने देखील आपल्या भावना पोस्टद्वारे व्यक्त करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
स्वप्निल जोशी याची पोस्ट:
डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांच्या गोष्टीतून प्रेरित झालेल्या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची होती. पराग कुलकर्णी यांनी मालिकेचे लेखन केले असून विद्याधर पाठारे यांनी निर्मिती सुत्रं सांभाळली होती. तसंच उमेश नामजोशी यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले होते. ('खतरों के खिलाडी 10' मध्ये अमृता खानविलकर घेणार का सहभाग?)
22 एप्रिलपासून सुरु झालेल्या या मालिकेने अवघ्या 3-4 महिन्यात आपला प्रवास थांबवला. पण 'शॉर्ट अॅड स्वीट' अशा मालिकेच्या प्रवासामुळे ती वेगळी आणि लोकप्रिय ठरली.