Bigg Boss 12: श्रीसंत - हरभजन वादावर श्रीसंतचा चकित करणारा खुलासा, म्हणे मैदानावर म्हणून झाले रडू अनावर ! (Video)
श्रीसंत - हरभजन वादावर बिग बॉसच्या घरात श्रीसंतने नवा खुलासा दिला आहे .
BiggBoss12: 2008 साली आयपीएल (IPL) सीझनमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग इलेव्हन्स (Kings 11 Punjab) सामन्यानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) श्रीसंतच्या (Sreesanth) कानाखाली लागावल्याच्या वादावरून मोठी चर्चा रंगली होती. सध्या बिग बॉसच्या घरात असलेल्या श्रीसंतने पुन्हा हा वाद समोर आणला आहे. एका टास्कदरम्यान श्रीसंतने या वादावर नवं स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाला श्रीसंत
श्रीसंतने दिलेल्या माहितीनुसार, हरभजन सिंगने कानाखाली मारण्यासाठी हात पुढे केलाच नव्हता. पण मुंबई पंजाब सामन्याला मीच स्वतः अधिक गांभीर्याने घेतल्याने मला मैदानावर रडू कोसळल्याच तो म्हणाला. श्रीसंत - हरभजन वादावर बिग बॉसच्या (Bigg Boss 12) घरात श्रीसंतने सुरभी राणासोबत बोलताना हा नवा खुलासा दिला आहे .
View this post on Instagram
Kal dekhiye... . . . . . Follow @realitygyan for more
A post shared by REALITYGYAN ( BB12 Khabri ) (@realitygyan) on
बिग बॉसच्या टास्कनुसार घरातील स्पर्धकांना काही ब्रेकिंग न्यूज तयार करायच्या आहेत. त्यामुळे खेळाचा भाग म्हणून श्रीसंतने हरभजन सोबत झालेल्या वादाला नवा ट्विस्ट दिला आहे ? ही हेच सत्य होतं हे श्रीसंत आणि हरभजनालाच ठाऊक आहे.
बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच श्रीसंतच तापट स्वभाव दिसला आहे. अनेक लहान सहान गोष्टींवरून त्याचा राग अनावर झाल्याचे, रडल्याचे किस्से चाहत्यांनी पाहिले आहेत. आता हा खुलासा बिग बॉसच्या घरात कोणतं नवं वळण घेऊन येतो हे पाहणं उत्सुकतेचं आहे.