Sidharth Shukla Passes Away: सिद्धार्थ शुक्लावर आज होणार अंत्यंसंस्कार, मुंबई पोलीस जाहीर करणार अधिकृत विधान
यामुळे संपूर्ण बॉलिवूडसह टीव्ही क्षेत्रात शोककळा पसरली. घरातील एकमेव मुलगा असलेल्या सिद्धार्थच्या निधनाने त्याचा आईला मोठा धक्का बसला आहे.
Sidharth Shukla Passes Away: बिग बॉस विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे संपूर्ण बॉलिवूडसह टीव्ही क्षेत्रात शोककळा पसरली. घरातील एकमेव मुलगा असलेल्या सिद्धार्थच्या निधनाने त्याचा आईला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सिद्धार्थ याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आज त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.(Sidharth Shukla, Pratyusha Banerjee आणि Surekha Sikri टेलिव्हिजन वरील Balika Vadhu मालिकेतील या तिन्ही कलाकारांनी घेतला जगाचा निरोप)
सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर असा अंदाज लावला जात होते की, त्याच्यावर गुरुवारी संध्याकाळीच अंत्यसंस्कार केले जातील. परंतु शवविच्छेदन आणि पोलीस तपासात वेळ झाल्याने ते शक्य झाले नाही. गुरुवारी 4 तासानंतर त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. आज सकाळी 11 वाजता सिद्धार्थ याचे पार्थिव घरातल्यांना दिले जाणार आहे.
शुक्रवारी त्याचे पार्थिव जुहू येथील ब्रम्हकुमारी ऑफिसात नेले जाणार आहे. तेथे पाठपुजा झाल्यानंतर त्याला निवासस्थाने नेण्यात येणार आहे. त्याची आई रीता शुक्ला ही ब्रम्हकुमारीज संस्थेशी गेल्या काही वर्षांपासून जोडली गेली आहे. याच कारणामुळे गेल्या काही काळापासून सिद्धार्थ शुक्ला सुद्धा ब्रम्हकुमारीज संस्थेशी जोडला गेला होता.(Sidharth Shukla Passes Away: सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने कलासृष्टीत शोककळा; सेहवाग, सुनील ग्रोवर यांनी केले ट्वीट)
शवविच्छेदनानंतर आज मुंबई पोलीस आज अधिकृत विधान जाहीर करणार आहेत. सुत्रांच्या मते कॅज्युअलिटी वॉर्डमध्ये काही वेळा सिद्धार्थ याच्या मृतदेहाचा बारीक तपास करण्यात आला. डॉक्टरांनी असे म्हटले की, सिद्धार्थ याच्या शरिरावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. पोलिसांनी सिद्धार्थ याची आई, बहिणी आणि भावोजी यांचा जबाब नोंदवला आहे.