स्वप्नील जोशी-अमृता खानविलकर 'जिवलगा' मालिकेतून पुन्हा एकत्र, पहा Promo

स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने सजलेली नवी मालिका जिवलगा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Jivalaga Marathi Serial Stars | (Photo Credit: File Photo)

स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने सजलेली नवी मालिका 'जिवलगा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'जिवलगा' ही एक प्रेमकथा असून यात नातेसंबंधांचे विविध पैलू उलगडताना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पाहायला मिळेल. तसंच प्रेमाची ताकद या मालिकेतून पाहायला मिळेल. मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

पहा जिवलगा मालिकेचा प्रोमो:

या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची असून डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. तर उमेश नामजोशी यांनी मालिकेच्या दिग्दर्शनाची सुत्रं सांभाळली आहेत. स्टार प्रवाहवर ही मालिका 22 एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता पहायला मिळेल.