शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर हिने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना दिले बळ, भगवदगीतेमधील काही ओळींची करुन दिली आठवण
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर अपूर्वा कायम वेगवेगळे फोटो शेअर करत असते. मात्र नुकताच तिने चाहत्यांना धीर देणारा एक व्हिडीओ शेअर केलाय.
'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेतील घराघरात पोहोचलेली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) सध्या कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ऑक्सिजन, लस, व्हेंटिलेटर यांसारख्या अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांचे मानसिकदृष्ट्याही खच्चीकरण होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना कोरोनाशी लढण्याचे बळ देण्यासाठी अपूर्वाने खास व्हिडिओ शेअर केला आहे. लोकांना कोरोना
अपूर्वा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर अपूर्वा कायम वेगवेगळे फोटो शेअर करत असते. मात्र नुकताच तिने चाहत्यांना धीर देणारा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने भगवद् गीतेत कृष्णाने पांडवाना दिलेल्या एका उपदेशाची आठवण करून दिलीय.हेदेखील वाचा- Virat Kohli-Anushka Sharma च्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला मिळाले मोठे यश, 24 तासांच्या आत जमा झाले 3.6 कोटी रुपये
"श्री कृष्णाने भगवद् गीतेत सांगितलंय, कमजोर तुम्ही नाही तुमची वेळ आहे. तुमचं जीवन हे तुमच्या भविष्यात नाही आणि भूतकाळातही नाही ते या क्षणात आहे. तर हा क्षण जपा. तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, उगीचच घराबाहेर पडू नका.” असं म्हणत अपूर्वाने चाहत्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय.
"आपण पुन्हा एकदा थांबलो. पण हे थांबणं गरजेचं आहे. कारण अनेक कुटुंबांमध्ये वाईट प्रसंग घडले आहेत. त्या सगळ्या परिवारांना इश्वर शक्ती आणि बळ देवो. सध्याच्या परिस्थितीमुळे लोकं घाबरत आहेत. पण घाबरू नका कारण आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे" असं म्हणत अपूर्वाने चाहत्यांना आवाहन केलं आहे.
या व्हिडीओला तिने 'हे ही दिवस जातील …. सरी सुखाच्या येतील' असं कॅप्शन दिलं आहे. अपूर्वाच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिलीय.