Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री करताचं सुरू झाली राखी सावंतची अरेरावी; म्हणाली, 'कोणालाचा झोपू देणार नाही'

राखी म्हणाली, मी तेच करते आहे जे ती करत होती.

Rakhi Sawant's fight started in house of Bigg Boss Marathi (PC - Instagram)

Bigg Boss Marathi 4: टीव्हीचा सर्वात आवडता शो 'बिग बॉस मराठी' आजकाल प्रत्येक घराघरात प्रसिद्ध होत आहे. शोमध्ये एकामागून एक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत आता बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. राखी सावंतचे बिग बॉसशी जुने नाते आहे हे खरे आहे. जेव्हा जेव्हा निर्मात्यांना शोमध्ये मनोरंजनाची कमतरता भासते तेव्हा लगेच राखीची एन्ट्री होते. यावेळीही असेच काहीसं झालं आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सिझनमध्ये सध्या राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ या सदस्यांनी दमदार एन्ट्री झाली आहे. परंतु, राखी सावंतची एन्ट्री होताचं तिने घरातील सदस्यांसोबत वाद घालायला सुरूवात केली आहे. राखीने तेजस्विनी लोणारीशी वाद घातला. रहिवासी संघ बोर्डवर पहिल्या नंबरला कोणाच्या नावाची पाटी लागणार यावरून तेजस्विनी व राखीमध्ये वाद झाला. या वादात विशाल निकमही उडी घेतो. (हेही वाचा -Igatpuri Rave Party: ‘बिग बॉस मराठी’ फेम हीना पांचाळ हिच्यासह 25 जणांना न्यायालयीन कोठडी; इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरण)

कलर्स मराठी वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये बिग बॉसचे सर्व सदस्य झोपलेले दिसत आहेत. अशातचं राखी मध्यरात्री ‘बिग बॉस’कडे कॉफी मागते. त्यानंतर राखी आधी अमृता धोंगडेशी वाद घालते आणि सर्व झोपले असताना मोठ-मोठ्याने बोलते. राखीचा आवाज ऐकून विशाल निकम म्हणतो, “तुमच्या बोलण्यामुळे सर्वांना त्रास होत आहे. शांत बसा.” यावर राखी म्हणते, “तू झोप मला सांगू नकोस. मी कोणालाचं झोपू देणार नाही.”

प्रोमोमध्ये अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, तुला झोपायचं नाहीये का? तुला डान्स करायचा आहे का? लाईट बंद झाले ना? मग झोप ना, असं राखी अमृताला म्हणते. त्यावर अमृता तिला झोपते आहे असं बोलते आणि यावरून वादाला सुरूवात होते. (हेही वाचा - Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात होणार अभिनेत्री Rakhi Sawant आणि पती Ritesh ची एन्ट्री; TRP वाढवण्यासाठी मेकर्सची नवी खेळी - Report)

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अमृता आणि राखीमध्ये चाललेल्या भांडणामध्ये विशाल उडी घेतो आणि तो राखीला म्हणतो की, तुम्ही तिला शिकवता आणि तुम्ही काय करताय ? तिला का बोलताय एवढं तोंड वर करून. राखी म्हणाली, मी तेच करते आहे जे ती करत होती. विशाल म्हणाला, गप बसायचं. यावर राखी विशालला तू गप बस, असं म्हणते. त्यामुळे हे भांडण आता किती विकोपाला जाणार हे पुढील भागात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.