Bigg Boss 14: राखी सावंत चा मोठा खुलासा; पैसे देण्याच्या बहाण्याने मित्राने केला होता लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न

राखी सावंतने जुने दिवस आठवत म्हटलं आहे की, पैसे देण्याच्या बहाण्याने तिच्या एका मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.

राखी सावंत (Image Credit: Instagram)

Bigg Boss 14: बिग बॉस (Bigg Boss 14) मध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) मनोरंजन करण्याची कोणतीही संधी गमावत नाही. प्रेक्षकांची मने कशी जिंकली जातात हे तिला माहित आहे. कधी अभिनवसोबत प्रेमसंबंधांचे बंधन दाखवून, तर कधी मस्ती करत राखी प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. पण आता राखीने स्वतःबद्दल असा खुलासा केला आहे, जे ऐकल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटेल. राखी सावंतने जुने दिवस आठवत म्हटलं आहे की, पैसे देण्याच्या बहाण्याने तिच्या एका मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.

बुधवारी झालेल्या एपिसोडमध्ये राखी बाथरूम परिसरात राहुलशी बोलताना दिसली होती. जिथे ती राहुलला सांगते की, जेव्हा ती नवीन-नवीन इंडस्ट्रीमध्ये आली होती, तेव्हा तिच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता. आईच्या उपचारासाठी तिला बरीच रक्कम हवी होती आणि कुटुंबाकडे इतके पैसे नव्हते. अशा परिस्थितीत राखीने मित्राकडे पैसे मागितले. (वाचा - Urmila Matondkar Birthday: पहिल्या चित्रपटापासून लव स्टोरी पर्यंत 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी खास गोष्टी जाणून घ्या)

राखीने पुढे सांगितले की, तिच्या मित्राने तिला पैसे देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे मला खूप आनंद झाला. परंतु, जेव्हा मी पैसे घेण्यासाठी त्याच्याकडे आली, तेव्हा त्या मित्राने माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. राखीने सांगितले की, जेव्हा ती तिच्या मित्राकडे गेली तेव्हा त्याने गाडीचा दरवाजा बंद केला आणि तिला कपडे उतरण्यास सांगितले. हे ऐकून तिला आश्चर्य वाटले. मित्राने तिला पैशाच्या बदल्यात त्यांच्याशी संबंध ठेवण्यास सांगितले. राखीने यास विरोध केला. त्यावेळी या व्यक्तीने राखील भररस्त्यात सोडून दिलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

या घटनेची आठवण झाल्यानंतर राखीला आजही भिती वाटते. तथापि, राखीने याविषयी कोणालाही सांगितले नाही. कारण, तिच्या बोलण्यावर कोणालाही विश्वास बसला नसता. तसचं राखीकडे यासंदर्भात कोणताही पुरावा नव्हता.