Pavitra Rishta 2.0 चा प्रोमो आऊट; शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा लोकप्रिय शो पवित्र रिश्ता ने सर्वांचे मन जिंकले होते. घरोघरी पोहचलेल्या या मालिकेने अल्पावधीतच लोकांच्या मनांत स्थान निर्माण केले होते. आता या मालिकेचा दुसरा पार्ट प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांचा लोकप्रिय शो 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) ने सर्वांचे मन जिंकले होते. घरोघरांत पोहचलेल्या या मालिकेने अल्पावधीतच लोकांच्या मनांत स्थान निर्माण केले होते. आता या मालिकेचा दुसरा पार्ट प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. पवित्र रिश्ता 2.0 (Pavitra Rishta 2.0) चा प्रोमो (Promo) समोर आला आहे. पवित्र रिश्ता मधील अर्चना आणि मानवची जोडी सुपरहिट ठरली होती. मात्र मानवची भूमिका साकारणारा सुशांत सिंह राजपूत हृयात नसल्याने त्याच्या जागी शाहिर शेख (Shaheer Sheikh) मानवची भूमिका साकारणार आहे. तर अंकिता पुन्हा एकदा अर्चना म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नवा प्रोमो अंकिता लोखंडे ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यात शाहिर आणि आंकिता मधील खास केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तुम्हीही पहा प्रोमो... (Pavitra Rishta 2.0: सुशांतसिंह राजपूतनंतर आता Shaheer Sheikh साकारणार 'पवित्र रिश्ता 2'मध्ये मानवची भूमिका; डिजिटली होणार प्रसारण)
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
प्रोमो रिलीज झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूतचे चाहते पुन्हा एकदा त्याच्या आठवणीत भावूक झाले आहेत. दरम्यान, सुशांतने मानवची भूमिका असल्याने एका उंचीवर नेऊन ठेवल्याने तुलना होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे शाहिरची तुलना सुशांत सोबत करणाऱ्या काही कमेंट्स प्रोमोवर आल्या आहेत. मात्र शो सुरु झाल्यानंतर अंकिता आणि शाहिरच्या जोडीला प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2021 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

