Bigg Boss 13 च्या घरात येणार नवीन ट्वीस्ट; सदस्यांच्या कुटुंबियांची होणार Wild Card Entry, जाणून घ्या कोणाची नावे चर्चेत
महत्वाचे म्हणजे हे नवे सदस्य घरातीलच आधीच्या सदस्यांचे कुटुंबीय असणार आहे.
भारतीय टेलीव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पहिले जाते. आता बिग बॉसचे 13 (Bigg Boss 13) वे पर्व सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या शोला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हा शो आणखी चार आठवडे वाढवण्यात आला. त्यानंतर अजून दोन आठवडे हा शो वाढवण्यात यावा अशी चर्चा होती. मात्र तसे होऊ शकले नाही. आता शोमध्ये अजून नाविन्य आणण्यासाठी मेकर्सनी एक निर्णय घेतला आहे. बिग बॉस 13 अंतिम टप्प्यात असताना घरात 5 सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) होणार आहे. महत्वाचे म्हणजे हे नवे सदस्य घरातीलच आधीच्या सदस्यांचे कुटुंबीय असणार आहे.
बिग बॉस इतिहासात असे पहिल्यांदा घडत आहे, जिथे घरातील सदस्यांचे कुटुंबीय वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतील. बिग बॉस खबरीच्या वृत्तानुसार घरात 5 नवीन वाईल्ड कार्ड एंट्री होतील, हे लोक घरात 3-4 दिवस राहतील आणि नंतर बाहेर जातील. सध्या तरी सुरु असलेल्या चर्चेमध्ये, आसिम रियाजचे वडील, शहनाज गिलचे वडील, माहिरा शर्माची आई, पारस छाब्राची आई, सिद्धार्थ शुक्लाची आई, शेफाली जरीवाला यांचे पती, आणि हिमांशी खुराणा वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश करू शकतात. मात्र अजूनतरी यावर बिग बॉस कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यासोबतच पारसची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीदेखील विकएंडसाठी घरात येण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा: Bigg Boss 13: बिग बॉस 13 ला दोन आठवड्यांचे Extension देण्यास मेकर्सचा नकार; जाणून घ्या कधी होणार Finale)
असे खरेच झाले तर हा नवीन ट्वीस्ट पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याआधी घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटून गेले होते, त्यावेळी दिल्या गेलेल्या कमेंट्समुळे नवीन वादही उद्भवले होते. आता हे सर्व लोक कसे एकत्र राहतील ते पाहण्यात मजा येणार आहे. दरम्यान, बिग बॉस 13 बद्दल प्रेक्षकांमध्ये वाढलेला उत्साह पाहून, मेकर्सनी हा शो आणखी काही दिवस वाढवायचा निर्णय घेतला. त्यानंतर अजून दोन आठवडा हा शो एक्स्टेंड करावा असे वाहिनेचे म्हणणे आहे, त्याला मेकर्सनी नकार दिला आहे.