KBC 12: दिल्लीची Nazia Nasim ठरली यंदाच्या सीजनची पहिली करोडपती; पहा आनंदी क्षणांचा धमाकेदार Video

सोनी टीव्हीने सोशल मीडियावर शो चा लेटेस्ट प्रोमो शेअर केला आहे.

KBC 12 First Crorepati (Photo Credits: Instagram)

Kaun Banega Crorepati 12: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लोकप्रिय गेम शो 'कौन बनेगा करोडपति 12' ला या सीजनमधील पहिला करोडपती मिळाली आहे. सोनी टीव्हीने (Sony TV) सोशल मीडियावर शो चा लेटेस्ट प्रोमो शेअर केला आहे. एका महिलेने या सीजनमधील पहिली करोडपती होण्याचा मान मिळवला आहे, हे या व्हिडिओतून स्पष्ट होते. नजिया नसीम (Nazia Nasim) असे या विजेत्या महिलेचे नाव असून ती दिल्लीची (Delhi) रहिवासी आहे. ती या शो मध्ये एक कोटी रुपये जिंकते. नाजिया या रॉयल एनफील्ड मध्ये कम्युनिकेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

या प्रोमोत तुम्ही पाहु शकाल की, अमिताभ बच्चन नाजिया यांना करोडपती म्हणून घोषित करतात. तसंच खुद्द बीग बींनी नाजियाच्या बुद्धीमत्तेचे कौतुक करतानाही व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बिग बी तिला 7 कोटींचा प्रश्न विचारतात. मात्र नाजिया 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर शो क्विट करते. प्रोमोतील एकंदर घडामोडींमुळे एपिसोड बद्दलची उत्सुकता वाढते. (KBC 12 Promo: कोविड-19 च्या सेटबॅक नंतर 'कौन बनेगा करोड़पति 12' सह कमबॅक करण्यासाठी अमिताभ बच्चन सज्ज, Watch Video)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

NAZIA NASIM is #KBC12’s first crorepati! Watch this iconic moment in #KBC12 on 11th Nov 9 pm only on Sony TV. @amitabhbachchan @spnstudionext

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on

हा एपिसोड तुम्ही 11 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर पाहू शकता. 28 सप्टेंबर पासून 'कौन बनेगा करोडपति' च्या 12 व्या सीजनला सुरुवात झाली. मे 2020 पासूनच शो साठी रजिस्ट्रेशन सुरु झाले होते. मात्र कोविड-19 लॉकडाऊनमुळे शो सुरु होण्यास काहीसा विलंब झाला. दरम्यान, खूप कमी लोक या शो मधून मोठी रक्कम जिंकतात. गेल्या वर्षी 4 स्पर्धक 1 कोटी रुपये जिंकले होते.