Undekhi च्या प्रमोशनसाठी Sony Liv कडून येणाऱ्या 'त्या' Calls बाबत मुंबई पोलिसांनी घेतली दखल; त्वरित असे कॉल्स बंद करण्याचा आदेश

सध्या या शोला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र या शोच्या प्रमोशनसाठी नेटवर्कने जो हटके प्रकार वापरला आहे, त्यामुळे जनता जेरीस आली आहे.

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

नुकताच सोनी लिव्ह (Sony Liv) वरील बहुप्रतीक्षित शो अनदेखी (Undekhi) प्रदर्शित झाला आहे. सध्या या शोला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र या शोच्या प्रमोशनसाठी नेटवर्कने जो हटके प्रकार वापरला आहे, त्यामुळे जनता जेरीस आली आहे. या शोच्या प्रमोशनसाठी लोकांना फोन केले जात आहेत व या सिरीजशी निगडीत एक वाक्य ऐकवले जात आहे, ज्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याबाबत नेटवर्कला समज दिली असून, असे कॉल्स ताबडतोब बंद करण्यास सांगितले आहे.

मुंबई पोलिसांनी याबाबत एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात- ‘कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी ही चांगली प्रसिद्धी’, असे म्हटले जाते. मात्र नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारी आणि त्यांच्या सुरक्षेस धोका असल्याचे दर्शविणारी प्रसिद्धी तितक्याच योग्य पद्धतीने व त्वरित हाताळणे गरजेचे आहे. आशा आहे की आता मुंबईकरांना प्रमोशनसाठीचे त्रासदायक फेक कॉल्स येणार नाहीत.’

मुंबई पोलीस ट्वीट -

अनदेखीच्या प्रमोशनसाठी जे कॉल्स येत होते त्यमुळे अनेकांना धक्का बसला होता. असा होता प्रमोशनचा फोन कॉल- समोरून फोन आल्यावर व्यक्ती म्हणते, ‘हेलो मी रिशी बोलतोय’, आपण काही म्हणायच्या आधीच समोरची व्यक्ती बोलायला लागते- ‘इथे एक खून झाला आहे. हा खून मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे आणि तो रिंकू मला देखील मारायचा प्रयत्न करेल.. ओह शीट.. अनदेखी स्ट्रीमिंग नाऊ ऑन सोनी लिव्ह’. (हेही वाचा:140 या अंकांनी सुरु होणाऱ्या नंबरवरून आलेला कॉल उचलल्यास गमावून बसाल बँक खात्यातील पैसे; Fake Number बाबत मुंबई पोलिसांना इशारा)

सोनी लिव्ह ट्वीट-

असे कॉल आल्यावर सुरुवातीची काही वाक्ये ऐकूनच लोक घाबरून जात होते. यातील काही लोकांनी सोशल मीडियावर ही गोष्ट शेअर करून मुंबई पोलिसांकडे मदत मागितली होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी याबाबत नेटवर्कला समज दिली आहे व असे कॉल्स ताबडतोब बंद करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र सायबरनेदेखील एक ट्वीट करत, असे कॉल आल्यास घाबरून जाऊन नका, सांगितले आहे. तसेच याबाबत वाहिनीला हे कॉल्स बंद करण्यास सांगितले असल्याची माहिती दिली आहे.