Mukesh Khanna Death Hoax: 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांच्या निधनाचे खोटे वृत्त सोशल मीडियात वायरल; अभिनेत्याने प्रकृती ठीक असल्याची दिली प्रतिक्रिया

मात्र या अभिनेत्याने आपली प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं आहे.

Mukesh Khanna As Shaktimaan (Photo Credits: Instagram/ Facebook)

सोशल मीडीयामध्ये ज्या वेगाने माहिती शेअर होत असते त्यापेक्षा जास्त वेगाने खोट्या बातम्या, अफवा पसरत असतात. या दृष्टचक्रात अनेकदा सेलिब्रिटींच्या खोट्या बातम्यांचा देखील समावेश असतो. मागील काही दिवसांत अनेक कलाकारांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरत आहेत. आता अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्या मृत्यूची देखील खोटी बातमी पसरत आहे. हे वृत्त वायरल झाल्यानंतर त्याला चाहत्यांकडून फोन कॉल येण्यास सुरूवात झाली. ही गोष्ट मुकेश खन्ना सोबतच त्याच्या परिवारासाठी धक्कादायक होती.

दरम्यान अभिनेता मुकेश खन्ना याने त्याच्या मृत्यूच्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी टाईम्स ऑफ़ इंडियाला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने संताप व्यक्त केला आहे. या प्रतिक्रियेमध्ये त्याने तो ठणठणीत असल्याचं म्हणाला आहे. मृत्यूच्या खोट्या बातम्यांमुळे त्याचे नातेवाईक, चाहते आणि परिचयाच्या व्यक्तींकडून फोन कॉल येण्यास सुरूवात झाली. याचा आम्हांला फारच त्रास झाला. असेदेखील तो म्हणाला. Singer Lucky Ali Death Hoax: गायक लकी अली यांच्या निधनाचं खोटं वृत्त सोशल मीडीयात वायरल; जाणून घ्या सत्य.

मुकेश खन्ना हा त्याच्या लोकप्रिय शो 'शक्तिमान' द्वारा घराघरात पोहचला आहे. 90 च्या दशकातील मुलांसाठी तो सुपरहिरो होता. त्यांच्यामध्ये मुकेश खन्नाची विशेष क्रेझ आहे. मुकेश खन्ना ने 'शक्तिमान' सोबतच बी आर चोपडा च्या महाभारत मध्ये भीष्म पितामह यांची देखील भूमिका साकारली आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात या 90 दीच्या शतकातील अनेक जुन्या मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये शक्तिमान चा देखील समावेश करण्यात आला होता.