Mouni Roy Pre-Wedding Ceromony: पार पडला अभिनेत्री मौनी रॉयचा 'हळदी' आणि 'मेहंदी' समारंभ; Mandira Bedi चा 'मेहंदी लगा के रखना' वर डान्स (See Photo and Video)
हळदी समारंभाच्या आणखी एका फोटोमध्ये मौनी रॉय तिच्या काही मैत्रिणींसोबत दिसत आहे.
टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) 27 जानेवारी 2022 रोजी गोव्यात लग्नबंधनात अडकणार आहे. मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) सप्तपदी चालणार आहे. आता लग्नाआधी मौनीचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. मौनी रॉयचा हळदी सोहळा (Mouni Roy's Haldi Ceromony) 26 जानेवारीला पार पडला. मौनीची मैत्रिण आश्का गोराडियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मौनी रॉयचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मौनी पारंपारिक पिवळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. याशिवाय मौनीच्या मेहंदी आणि हळदी सेरेमनीचे आणखी काही फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.
एका फोटोमध्ये, मौनी रॉय तिच्या भावी वर सूरज नांबियारसोबत पांढऱ्या पोशाखात हळदी समारंभात मिरवताना दिसत आहे. हळदी समारंभाच्या आणखी एका फोटोमध्ये मौनी रॉय तिच्या काही मैत्रिणींसोबत दिसत आहे. त्यापैकी जिया मुस्तफा, मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानी, रोहिणी अय्यर लग्नासाठी गोव्यात पोहोचल्या आहेत. या समारंभातील एजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये मंदिरा बेदी आपल्या 'मेहंदी लगा के रखना' गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.
रिपोर्ट्सनुसार, कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता मौनी आणि सूरजच्या लग्नासाठी फक्त 100 लोक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सूरज नांबियार दुबईत राहतो, जिथे तो बँकर आणि व्यापारी आहे. यासोबतच त्याची पुण्यात इव्हेंट कंपनी असून सूरज बंगळुरूच्या जैन कुटुंबातील आहे. (हेही वाचा: Hruta Durgule चा Prateek Shah सोबत साखरपुडा संपन्न; Happily Engaged म्हणत दोघांनी शेअर केले रोमॅन्टिक फोटोज)
सूरज आणि मौनीची पहिली भेट डिसेंबर 2019 मध्ये दुबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली होती. दोघेही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी तिथे पोहोचले होते. दोघे अनोळखी म्हणून भेटले व दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. यानंतर सूरज आणि मौनी एकमेकांना पसंत करू लागले आणि डेटिंग सुरु झाली.