Sai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी
याखाली 'गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात या गोष्टीवर माझा विश्वास बसला आहे. कारण मला माझा जोडीदार मिळाला आहे.' असे कॅप्शन लिहिले आहे.
मराठी वाहिनीवर लोकप्रिय झालेला आणि घराघरात पोहोचलेल्या मराठी बिग बॉसचा सीजन 1 (Bigg Boss Marathi 1) खूपच चर्चेत आला होता. हा कार्यक्रम जितका तितकेच त्यातील स्पर्धकही. त्यातील एक स्पर्धक अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) हिने या कार्यक्रमातून स्वत:चा असा चाहता वर्ग निर्माण केला. त्यात तिची मेघा घाडे, पुष्कर जोग यांच्या सोबत असलेली मैत्री देखील चांगलीच रंगली. त्यानंतर सई सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होती. नुकतीच तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण प्रेमात पडलो असून आपल्याला आपला योग्य जोडीदार मिळाल्याचे सांगितले आहे. तिचा हा जोडीदार कोण यासाठी तिने त्या दोघांचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटवर सईने तिचा आणि तिच्या जोडीदाराचा पाठून काढलेला फोटो शेअर केला आहे. याखाली 'गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात या गोष्टीवर माझा विश्वास बसला आहे. कारण मला माझा जोडीदार मिळाला आहे.' असे कॅप्शन लिहिले आहे. त्यासोबतच #inlove असा हॅशटॅगसुद्धा तिने या फोटोला दिला आहे. सोनाली कुलकर्णी हिचे होणारा नवरा कुणाल बेनोडेकर सोबत रोमॅंटिक फोटोशुट पाहुन तुम्हीही म्हणाल WOW! (Photos Inside)
तसेच तिचा हा प्रियकर, तिचा जोडीदार कोण आहे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे हा कोण आहे, चित्रपटसृष्टीतील की अन्य कोणी हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
सई लोकूर बिग बॉस आधी 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.