Dhanashri Kadgaonkar Pregnant: अभिनेत्री धनश्री काडगावकरने खास व्हिडिओ द्वारा शेअर केली ‘गुड न्यूज’; लवकरच होणार आई!
धनश्री लवकरच आई होणार आहे.
मराठी टेलिव्हिजनवर 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'नंदिता वहिनी' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanashri Kadgaonkar) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. धनश्री लवकरच आई होणार आहे. काल (10 ऑक्टोबर) एका खास व्हिडिओच्या माध्यमातून धनश्रीने ती गरोदर असल्याची गोड बातमी शेअर केली आहे. दरम्यान धनश्रीच्या या 'गुड न्यूज' च्या व्हिडिओनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरूवात झाली आहे.
धनश्री आणि तिचा पती दुर्वेश देशमुख यांनी गावरान अंदाजामध्ये एक खास व्हिडिओ शूट केला आहे. इंस्टाग्रामवर धनश्रीनेहा व्हिडिओ शेअर केला आहे. काल (10 ऑक्टोबर) दुर्वेशचा वाढदिवस होता. त्याच्या बर्थ डे च्या दिवसाचं औचित्य साधत धनश्रीने तिची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. Kareena Kapoor Is Pregnant Again! दुसऱ्यांदा आई होणार करीना कपूर; सैफ आली खानसह जॉइंट स्टेटमेंट द्वारे दिली नवीन पाहुण्याच्या आगमनाची 'Good Newwz'!
धनश्री काडगावकरची इंस्टाग्राम पोस्ट
धनश्री काडगावकर सध्या कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर शूटिंगपासून लांब आहे. झी युवा वर 'युवा डान्सिंग क्वीन'ची स्पर्धक होती. मात्र हा कार्यक्रम लॉकडाऊननंतर रिझ्युम करण्यात आलेला नाही. दरम्यान धनश्रीने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना, 'सध्या कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शुटिंगपासून लांब असल्याचं सांगितलं आहे. अनेक कार्यक्रमांच्या ऑफर्स आल्या होत्या मात्र सध्या शूटिंग करणं सुरक्षित नसल्याने त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलं आहे. दरम्यान वर्कहॉलिक असून घरी बसावं लागत असल्याने पुस्तकं वाचण्यात, गाणी ऐकण्यात मन रमवत असल्याचं तिनं म्हटलं आहे.