1962 The War In The Hills वेब सिरिजमधून महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर करणार डिजिटल डेब्यू
या मालिकेची कहाणी 1962 च्या भारत आणि चीनमधील युद्धांवर आधारित आहे. या युद्धात भारतीय सैनिकांनी अभूतपूर्व धैर्य दाखवले होते. 3000 चिनी सैनिकांसमोर फक्त 125 भारतीय सैनिकांची बटालियन होती.
1962 The War In The Hills: बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची वेब सीरिज 1962- द वॉर इन द हिल्स डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे. भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या वेब सिरिजमध्ये महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकरदेखील (Satya Manjrekar) भूमिका साकारताना दिसणार आहेत. या वेब सिरिजमधून सत्या डिजिटल डेब्यू करणार आहे.
मेजर सूरजसिंग (अभय देओल) बटालियनमध्ये सत्या गोपाळ नावाच्या एका तरुण सैनिकाची भूमिका साकारणार आहे. सत्याने त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना सांगितले की, लहानपणापासूनच माझे वडील माझे रोल मॉडेल आणि प्रेरणास्थान आहेत. मी त्याचे काम बर्याच वर्षांपासून बारकाईने पाहिली आहे. ते एखादी कथा अत्यंत सुंदरपणे दिग्दर्शित आणि सादर करतात. 1962: द वॉर इन हिल्सच्या शूटिंगदरम्यान एक आरामदायक वातावरण होते. त्यामुळे मी त्यांना सहजपणे प्रश्न विचारू शकत होतो. माझ्या लक्षात आलं की, दिग्दर्शक म्हणून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी संपूर्ण कलाकारांना खूपचं आरामदायी वाटलं. त्याच्याबरोबर सेटवर काम करत असताना सर्वांनाच आपल्या घरात काम केल्यासारखं वाटत होतं. (वाचा - Avika Gor Hot Photos: 'बालिका वधु' फेम आनंदी म्हणजे 'अविका गोर'मध्ये झाला आहे मोठा बदल; Sizzling फोटो पाहून ओळखणेही कठीण)
यापूर्वी सत्याने मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. सत्या आई आणि एफयू- फ्रेंडशिप अनलिमिटेड तसेच हिंदी चित्रपट वाह! मध्ये दिसला होता. सत्याने एका चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केलं आहे. 1962 वेब सिरिजमध्ये अभय देओल, सुमीत व्यास, आकाश ठोसर, अनूप सोनी, माही गिल आणि रोहन गंडोत्रा हे उत्कृष्ट कलाकार दिसणार आहेत. ही वेब सिरिज 26 फेब्रुवारीला डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्ने + हॉटस्टार प्रीमियमवर प्रदर्शित होईल.
या मालिकेची कहाणी 1962 च्या भारत आणि चीनमधील युद्धांवर आधारित आहे. या युद्धात भारतीय सैनिकांनी अभूतपूर्व धैर्य दाखवले होते. 3000 चिनी सैनिकांसमोर फक्त 125 भारतीय सैनिकांची बटालियन होती. याच युद्धावर आधारित एक हिंदी चित्रपटही आला होता. त्या चित्रपटात धर्मेंद्र, बलराज साहनी आणि प्रिया राजवंश यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. कर चले हम फिदा हे गाणं अजूनही देशभक्ती आणि त्यागाची कहाणी सांगते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)