Kaun Banega Crorepati15: कौन बनेगा करोडपती 15 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो पाहून प्रेक्षकांची आंनद गगनात मावेना
काही दिवसांपुर्वी अभिनेता अमिताब बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती १५ च्या संदर्भात फोटो शेअर केला होता.
Kaun Banega Crorepati 15: प्रेक्षकांची आतुरता संपली, सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम कौन बनेगा करोडपती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौन बनेगा करोडपती 15 ची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर नुकताच या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांचा आंनद गगनात मावेना. येत्या 14 ऑगस्टला रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. अशी घोषणा निर्मात्यांनी केली आहे. सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक हा कार्यक्रम आहे. सोनी टीव्हीने 'कौन बनेगा करोडपती 15'चा प्रोमो शेअर करत खास कॅप्शन दिलं आहे. "ज्ञानदार, धनदार आणि शानदार असेल 'कौन बनेगा करोडपती 15'. या नव्या पर्वात नाविन्यताही असेल".