'कसौटी जिंदगी' मालिकेतील पार्थ समथान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

कसौटी जिंदगी की 2 या मालिकेमधील अनुरागची भूमिका साकारणारा टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्य सरकारने मालिकांच्या शूटिंगला काही अटींसह परवानगी दिली होती. पार्थची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने 'क्लिक निक्सोन स्टुडिओ'तील शूटिंग थांबविण्यात आले आहे. या स्टुडिओमधील सर्वांच्या कोरोना चाचण्या होणार आहेत.

TV Actor Parth Samthan (PC - Instagram)

बॉलिवूडमध्ये अनेक कोरोना प्रकरण समोर येत आहेत. शनिवारी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची कोरोना चाचणी (Coronavirus Test Positive) पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज पुन्हा ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या या दोघींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

कसौटी जिंदगी की 2 (Kasauti Zindagi Ki 2) या मालिकेमधील अनुराग बसुची (Anurag Basu) भूमिका साकारणारा टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान (Parth Samthan) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्य सरकारने मालिकांच्या शूटिंगला काही अटींसह परवानगी दिली होती. पार्थची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने 'क्लिक निक्सोन स्टुडिओ'तील शूटिंग थांबविण्यात आले आहे. या स्टुडिओमधील सर्वांच्या कोरोना चाचण्या होणार आहेत. (हेही वाचा - सलमान खान ने शेअर केला शेतात काम करतानाचा फोटो म्हणाला, 'दाने दाने पे लिखा होता हैं, खाने वाले का नाम')

 

View this post on Instagram

 

Hi everyone , I have been tested Postive for covid 19 .although I have mild symptoms.. I would urge and request everyone whose been with me in close promitixy over the last few days please go and get yourself tested . The Bmc has regularly been in touch and with the doctors guidance I am in self quarantine and I am grateful to them for all their support . Please be safe and take care 😇

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan) on

दरम्यान, क्लिक निक्सोन स्टुडिओमध्ये 'कसौटी जिंदगी की', 'कुमकुम भाग्य', 'पवित्र भाग्य' मालिकांची शूटिंग सुरू होती. परंतु, पार्थची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या सर्वांमध्येचं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही दिवसांकरिता हा स्टुडिओ सील करण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now