टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळी ती कोणत्याही सीरियलमुळे नव्हे, तर अलीकडील तिच्या फोटोमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिकिनीमधील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये करिश्माने आपल्या मादक आणि कमनीय देहाचे दर्शन तिच्या चाहत्यांना घडवले आहे. आजचे गुरुवारचे औचित्य साधून हा Throwback फोटो तिने पोस्ट केला आहे. करिश्मा नुकतीच मालदीवला गेली होती, त्यावेळचा हा फोटो असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये ती एका नयनरम्य बीचवर उभा राहिली आहे.
करिश्मा तन्ना छोट्या पडद्यावरील हॉट आणि मादक कलाकारांपैकी एक आहे. करिश्माच्या सेक्सी लुकमुळे तिची लोकप्रियता प्रचंड आहे. ती कोणत्याही पोशाखात अप्रतिम दिसते, अशीच ती या बिकनीमध्येही दिसत आहे. करिश्मा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिवआहे. इन्स्टाग्रामवर तिचे 39 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच स्टाईलिश फोटो पोस्ट करत असते. 2019 मध्ये करिश्माच्या मालदीव ट्रीपची बरीच चर्चा झाली होती. आता अशीच चर्चा या बिकनी फोटोची होत आहे. (हेही वाचा: करिश्मा तन्ना हिचा जलतरण तलावात Sexy Bikini अवतार; पाहा फोटो, सोबत स्लो मोशन व्हिडिओसुद्धा)
दरम्यान, करिश्मा तन्नाचा जन्म 21 डिसेंबर 1984 रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला. करिश्मा तन्नाने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. छोट्या पडद्यावर तिने ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या लोकप्रिय मालिकांद्वारे डेब्यू केला. करिश्मा तन्ना हिंदी चित्रपटांसोबतच अनेक दक्षिणी चित्रपटांमध्येही दिसली आहे. पुढे बिग बॉस मुळे तिचा प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोच्या समाप्तीनंतर करिश्मा आणि उपेन नच बलिए या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसले होते.