Karbhari Lay Bhari Serial: 'कारभारी लय भारी' मालिकेत कारभारीण बनलेली अनुष्का सरकटे याआधी दिसली होती देवी लक्ष्मीच्या भूमिकेत, वाचा सविस्तर
कुणाचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं काही, याआधी कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय आणि प्रचंड गाजलेली मालिका 'लक्ष्मीनारायण' (Laxmi Narayan) मध्ये अनुष्काने लक्ष्मी देवीची भूमिका साकारली होती.
सध्या सर्वत्र मराठी वाहिन्यांवर नवनवीन विषय घेऊन नवीन मालिका येण्याचा सपाटा सुरु आहे. कलर्स वाहिनी असो, स्टार प्रवाह असो वा झी मराठी. नवनवे विषय घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या नवीन मालिका येत आहे. त्यात सध्या झी मराठीवरील (Zee Marathi) 'कारभारी लयभारी' (Karbhari Lay Bhari) या मालिकेची बच्चे कंपनीपासून मोठ्यांमध्ये प्रचंड हवा आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांपासून याचे शीर्षक गीत प्रचंड लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील कारभारी प्रमाणे त्यात दिसणारी त्याची गोड चेह-याची कारभारीण देखील कोण आहे याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. हा नवा कोरा चेहरा पाहून सर्वांना या अभिनेत्रीची पहिली मालिका आहे असे वाटत असेल मात्र कारभारीण बनलेल्या अभिनेत्री अनुष्का सकरटे हिने याआधी देवी लक्ष्मीची भूमिका साकारली होती.
कुणाचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं काही, याआधी कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय आणि प्रचंड गाजलेली मालिका 'लक्ष्मीनारायण' (Laxmi Narayan) मध्ये अनुष्काने लक्ष्मी देवीची भूमिका साकारली होती.
या मालिकेनंतर अनुष्काच्या पदरात कारभारी लयभारी ही मालिका पडली आहे. मूळची औरंगाबादची असलेली अनुष्काने आपली महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाची आवड असल्याने ती अभिनय क्षेत्रात वळाली. झी मराठीवर आजपासून 'कारभारी लयभारी' मालिका प्रदर्शित होणार असून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लोकांमध्ये या मालिकेतील विषय आणि या मालिकेत अनुष्का आणि निखिल चव्हाण (Nikhil Chavan) व्यतिरिक्त आणखी कोण कोण कलाकार असतील याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.